गाजर व बीटची‌ बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#EB13 #W13
हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो.
पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे.

गाजर व बीटची‌ बर्फी (Gajar beetchi barfi recipe in marathi)

#EB13 #W13
हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणावर मिळतात.त्यामुळे गाजर हलवा तर आपण नेहमीच करतो.
पण आज मी गाजराची बर्फी केली आहे आणि त्यात थोडे बीट घातले आहे.दोन्हीही घटक पौष्टिक आहे. बिटामुळे बर्फीला छान रंग आला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
40 नग
  1. 250 ग्रॅमगाजर. (1.1/2 कप किस)
  2. 2 लहानबीट.(1/2 कप किस)
  3. 1/4 कपसाय
  4. 1/2 कपडेसिकेट कोकोनट
  5. 1 कपसाखर
  6. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 टीस्पूनसाजूक तूप
  8. 2-3 टेबलस्पूनकाजू, बदाम, पिस्ता यांचे तुकडे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गाजर व बीट यांची सालं काढून, धुऊन घेऊन, किसून घेणे.

  2. 2

    गॅसवर पॅन गरम करत ठेवणे. डेसिकेटेड कोकोनट 2-3 मिनिटे परतवून घेणे. नुसते गरम करून घ्यायचे आहे. डीशमध्ये काढून घेणे.
    पॅन मध्ये तूप घालून घेणे.

  3. 3

    गाजर व बीट यांचा किस घालून त्यातील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतून घेणे. नंतर साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. साखरेमुळे पाणी सुटते. त्यामुळे दोन्ही किस व्यवस्थित शिजतात.मिश्रण सतत हलवत रहावे.

  4. 4

    साखरेचे पाणी बऱ्यापैकी म्हटली की त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. 5 -7 मिनिटांनी डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करणे.ट्रे ला तूप लावून घेणे.गॅस मंद आचेवर ठेवावा.

  5. 5

    मिश्रण सतत हलवत रहावे. त्याचा गोळा होत आला की, तसेच मिश्रण भांड्यापासून सुटू लागले की.गोळा तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून पसरवून घेणे.

  6. 6

    वरून सुकामेव्याचे काप लावून घेणे.हाताने थोडे दाबून घेणे.मिश्रण थंड झाल्यावर सुरीने हव्या त्या आकारात वड्या कापून घेणे.

  7. 7

    खाण्यासाठी तयार पौष्टिक गाजर व बिटाची बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes