7 कप बर्फी (7 Cup Burfi Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

7 कप बर्फी (7 Cup Burfi Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ लोकांसाठी
  1. 1 कपदूध
  2. 1 कपतूप
  3. 2 कपसाखर
  4. 1 कपबेसन
  5. 1 कपकाजू पावडर
  6. 1 कपडेसिकेटेड कोकोनट
  7. वेलची पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    कढई गरम करत ठेवा यामध्ये एक कप बेसन घाला आणि बेसन भाजत राहा पहिल्यांदा कोरडेच बेसन भाजा न तूप घालता बारीक गॅसवर बेसन खमंग भाजा

  2. 2

    आता कढईमध्ये तूप घाला आणि बेसन भाजा

  3. 3

    आता एक कप डेसिकेटेड कोकोनट घाला आणि परता

  4. 4

    आता यामध्ये एक कप दूध घाला,दोन कप साखर घाला

  5. 5

    उलातल्याने सतत ढवळत रहा दूध आटत आल्यानंतर यामध्ये एक कप काजू पावडर घाला

  6. 6

    चमच्याने सतत ढवळत राहा यातील दूध साखर सर्व आटल्यानंतर कडेला साईडून तूप सुटते यावरून आपल्याला कळते की हे मिश्रण आता वडी थापायला आले आहे तयार आहे ताटाला तूप लावून घ्या आणि यावर बटर पेपर लावा हे मिश्रण ओता चमच्याने एकसारखे करा थोडंसं थंड व्हायला ठेवा अर्धा तासाने याच्या वड्या कापा

  7. 7

    फ्रिजमध्ये सुद्धा सेट व्हायला ठेवू शकता

  8. 8

    गणपतीचा प्रसाद देण्यासाठी सात कप बर्फी तयार आहे

  9. 9

    खूप चविष्ट लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes