गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

गाजर हलवा रेसिपी
सगळ्यांचा आवडता गाजर हलवा मी आज केला. या दिवसांमध्ये लालबुंद गाजर बाजारात मिळत आहे. त्याला पहिले कि गाजर हलवा करायचा मोह होतो. मग काय मुलीची फर्माईश होतीच गाजर हलवा कर आई 😍 घेतला करायला हलवा. कसा झाला आहे ते सांगा.

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

गाजर हलवा रेसिपी
सगळ्यांचा आवडता गाजर हलवा मी आज केला. या दिवसांमध्ये लालबुंद गाजर बाजारात मिळत आहे. त्याला पहिले कि गाजर हलवा करायचा मोह होतो. मग काय मुलीची फर्माईश होतीच गाजर हलवा कर आई 😍 घेतला करायला हलवा. कसा झाला आहे ते सांगा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 4 कपखिसलेले गाजर
  2. 2 कपसाखर
  3. 2 टीस्पूनवेलदोडा पूड
  4. 1 टीस्पूनजायफळ पूड
  5. आवडीनुसार ड्रायफ्रूट
  6. 1/4 कपदुध
  7. 3/4 कपखवा
  8. 2 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ धून त्याचे साली काढून घेणे. व खिसणीने खिसुन घेणे.

  2. 2

    नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात 2 मोठे चमचे तूप घालून ते तापण्यास ठेवावे. तूप तापले कि त्यात खिसलेलं गाजर घालावे.5 मिनिटे त्याची छान वाफ काढून घेणे. नंतर त्यात आवडीनुसार साखर घालावी व ते मिश्रण एकजीव करून घेणे.

  3. 3

    हळू हळू त्या गाजरातील साखर विरघळण्यास सुरवात होते. व पाणी सुटायला लागते. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यातील साखरेचे झालेले पाणी आटवून घेणे. व त्यातच थोडे दूध घालावे.

  4. 4

    त्या साखरे मध्ये आणि दुधा मध्ये ते गाजर 15 मिनिटे शिजवून घेणे.त्याला उकळी येऊ लागते व त्यातील पाणी आटण्यास सुरवात होते.ते मिश्रण थोडे घट्ट होण्यास लागले कि त्यात हाताने तो खवा मोकळा करून त्या गाजर मध्ये घालावा. व त्यात जायफळ आणि वेलदोडा पूड घालून ते मिश्रण छान एकजीव करून घेणे.

  5. 5

    10 मिनिटे पुन्हा त्यातील पाणी आटवून घेणे. त्यातील मॉइश्चर हळू हळू कमी झाले कि त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून ते मिश्रण थोडे घट्ट ठेवावे. व गॅस बंद करावा. अशाप्रकारे मस्त, डेलिसिऊस असा गाजर हलवा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes