मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#Diwali2021
Happy Diwali in advance to everyone 🎉🎊 हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे वर्षभरातील मोठा सण म्हणजे दिवाळी ...दिवाच्या उत्सव..! खरच दिवाळी हा सण आपल्यात नवं चैतन्य, उर्जा घेउन येतो ,दिवाळीतील दिव्याप्रमाणेच सगळयांचे आयुष्य उजळून निघावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏼दिवाळी म्हणले की गोड-धोड पदार्थ हे आलेच म्हणून त्याची सुरुवात गोड पदार्थांनेच म्हणून मी आज मैसूर पाक बनवला आहे.मैसूर पाक,बाकरवडी, करंज्या,मोतीचुर लाडू असे काही पदार्थ हमखास दिवाळीतच आपल्याकडे बनवले जातात .तर मग पाहुयात हलवाई सारखा मैसूर पाक कसा घरच्या घरी बनवायचा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 1 कपतूप
  3. 1 कपतेल
  4. 1 कपसाखर

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग बेसन चाळणीने चालून घ्या,एक कढई मध्ये साखर घालून साखर बुडेल इतकंच पाणी घालून गॅसवर ठेवा व सतत ढवळत रहा

  2. 2

    दुसऱ्या एक कढई मध्ये तूप व तेल घालून ते दुसऱ्या गॅसवर तापवायला ठेवा,ते कडकडीत गरम झाले पाहिजे

  3. 3

    साखरेचा एकतारी पाक करून घ्या,मग त्यात चाळून घेतलेले बेसन घालून छान गाठी न होता हलवुन घ्या 5-7 मिनिटे

  4. 4

    मग त्यात आपण गरम केलेले तेल-तूप मिश्रण एक पळीने घाला व सर्वं मिश्रण मिसळून घ्या असच परत -परत करा जो पर्यंत आपलं कढई मधले तेल-तूप मिश्रण समाप्त होत नाही,तेल-तूप हे कडकडीत गरम असले पाहिजे हे महत्त्वाचे,पुर्ण तेल-तूप मिश्रण संपले नंतर सर्वं मिश्रण एकसारखे हलवत रहा जोपर्यंत तेल -तूप मिश्रनात समाविष्ट होत नाही तोपर्यंत

  5. 5

    एक प्लॅस्टिक डब्याला तूप लावून ग्रिसिग करून घ्या,मग कढई मधले मिश्रण सर्व डब्यात ओतून एकसारखे थापून घ्या व 5 मिनिटानंतर त्याच्या वड्या चाकूने पाडून घ्या

  6. 6

    मग 30 मिनिटे मैसूर पाक तसाच डब्यात राहू द्या,मग डबा उलटा करून वड्या काढून घ्या

  7. 7

    दिवाळीत हा मैसूर पाक नक्की करून पाहा,हलवाई कडचा मैसूर पाक विसरून जाल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes