ब्रेड गुलाबजाम

Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803

#Goldenapron3 गुलाबजाम म्हणजे माझ्या आवडीचा पदार्थ😊😊😊

ब्रेड गुलाबजाम

#Goldenapron3 गुलाबजाम म्हणजे माझ्या आवडीचा पदार्थ😊😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 9ब्रेड
  2. 250 ग्रामसाखर
  3. 1 कपदुध
  4. 5वेलदोडे
  5. 100 ग्रामखिशमिश(मणुुके)

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम ब्रेड चे काट काढून घेऊन त्याचे तुकडे करून घेतले.

  2. 2

    त्या नंतर ब्रेडचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पुड करून घेतली.

  3. 3

    आता ब्रेड ची पुड एका प्लेट मध्ये काढुन घेऊन त्यामध्ये थोडे थोडे सायचे दुध घालून म्ऊसर मळून घ्यावे. 10 मि. झाकून ठेवा.

  4. 4

    आता आपण पाकाची तयारी करू.एका पातेल्यात दोन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवले.पाणी गरम झाल्यावर त्यात मी दिड कप साखर घेतली.(साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता). पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये वेलदोडे टाकून सतत ढवळून घेऊन त्याचा जाडसर पाक करून घेतला.

  5. 5
  6. 6

    पाक थंड होण्यासाठी ठेवला व गुलाबजाम बनवायला घेतले. मळुन घेतलेल मिश्रण पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घेतले. व त्यांचे लहान गोळे करून घेतले. गोळे करताना मी त्यामध्ये मणुके पेरले त्यामुळे एक वेगळीच चव आली गुलाबजाम ला.

  7. 7

    सर्व गोळे तयार आहेत आता.

  8. 8

    आता हे गोळे तळून घेऊ. मी गोळे तळण्यासाठी लोखंडी तवा वपरला आहे.(मला पांरपरीक भांडी आवडतात स्वंयपाक करताना जसे लोखंडी भांडी मातीची भांडी) आणि ते गोळे मस्त खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  9. 9

    सर्व गोळे तळुन घेतले.

  10. 10

    गोळे पुर्ण थंड झाल्यानंतर हलक्या हातानी पाकत सोडले.

  11. 11

    पाकात गुलाबजाम चार तास मुरत ठेवले व रात्री जेवणानंतर स्वीट डिशवर ताव मारला.खुप आवडले सर्वांना माझी हि रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803
रोजी

टिप्पण्या (2)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
मला ब्रेड गुलाबजाम ची रेसिपी आवडली.मी त्यात थोडे बदल करून रेसिपी रिक्रीएट केली.

Similar Recipes