झणझणीत पाटवडी रस्सा (विदर्भ स्पेशल)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

#goldenapron3
वापरलेला शब्द : spicy

झणझणीत पाटवडी रस्सा (विदर्भ स्पेशल)

#goldenapron3
वापरलेला शब्द : spicy

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमहरभरा पीठ
  2. 1कांदा
  3. 2-3लसूण पाकळ्या
  4. 1 इंचआले
  5. 1 टीस्पूनकोथिंबीर (चिरलेली)
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/4 टीस्पूनमोहरी
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2टमाटर (चिरलेला)
  11. चवीनुसार मीठ
  12. 2टिस्पून तेल
  13. 1 कपपाणी

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    एका भांड्यात बेसन घ्या, त्यात हळद, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, मीठ घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.आता हळूहळू आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ बनवून 10 मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    आता एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, आले घालून कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
    आता त्यात टमाटर घाला आणि टमाटर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या

  3. 3

    हे मिश्रण मिक्सर जारमध्ये टाका आणि आवश्यक असल्यास पाणी घाला आणि मऊ पेस्ट करून घ्या.

  4. 4

    आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या.

  5. 5

    आता त्यात तयार मसाला पेस्ट,कोथिंबीर घाला आणि 5-10 मिनिटे कमी आचेवर शिजू द्या.मसाला छान भाजून झाला कि त्यात लाल तिखट,हळद,गरम मसाला आणि मीठ घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.

  6. 6

    तोपर्यंत पाटवड्या करून घ्या.
    त्यासाठी तयार बेसनाचा गोळा घ्या त्याला कोरड्या पिठामध्ये मिसळा आणि
    त्याची पोळी लाटून घ्या आणि त्याचे आवडीच्या आकाराचे काप करून घ्या.

  7. 7

    आता मसाल्याच्या पाण्याला उकळी आली कि त्यात तयार पाटवड्या घाला आणि पाटवड्या शिजेपर्यंत 10-12 मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या.

  8. 8

    गरमागरम पाटवडी तयार आहे.
    पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes