व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4
#week1
#उत्तप्पा
गोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला.

व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)

#GA4
#week1
#उत्तप्पा
गोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
६ जण
  1. 1 कपउकडा तांदूळ (boiled rice)
  2. 2 कपजाडे तांदूळ
  3. 1 कपउडीद डाळ
  4. 1/4 टिस्पून मेथी
  5. 2-3 चिरलेले कांदे
  6. 2टोमॅटो चिरलेले
  7. 1गाजर बारीक चिरलेले
  8. 5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  10. चवीनुसार मीठ
  11. 3 टेबलस्पूनतेल
  12. पाणी
  13. हिरव्या चटणीसाठी :
  14. 4-5हिरव्या मिरच्या
  15. १/२ इंच आलं
  16. 1 वाटीकोथिंबीर
  17. ८-१०लसूण पाकळ्या
  18. चवीनुसार मीठ
  19. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम आदल्या दिवशी सकाळी तांदूळ व उडीदडाळ, मेथी स्वच्छ धुवून पाणी घालून ७-८ तास भिजवावी, रात्री धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटतानाच मीठ घालावे, चांगलं मिक्स करून उबदार जागी रात्रभर आंबवण्यासाठी झाकुन ठेवणे. सकाळी मस्त पीठ फुगलेलं दिसेल.

  2. 2

    कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. मिनी उत्तप्पा पॅनवर तेल लावून त्यात एक एक मोठा चमचा पिठाचे मिश्रण घालून त्यावर चिरलेले सर्व थोडे थोडे घाला. झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा. पालटून परत २ मिनिटे शिजवा.

  3. 3

    चटणीसाठी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर, ओलं खोबरं, मीठ, थोडं पाणी घालून वाटा, ही झाली चटणी तयार, हवे असल्यास वरून फोडणीही घालू शकता.

  4. 4

    खायला तयार आहे व्हेज मिनी उत्तप्पा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes