काकडीची खमंग कढी

Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
पुणे

#फोटोग्राफी

'कढी' हा एक पारंपारिक पदार्थ आहे..कढी चे अनेक प्रकार आहेत साधी हळद घातलेली कढी, गुजराथी कढी, सिंधी कढी. तर आज मी केली आहे 'काकडी ची खमंग कढी' कुछ हटके..काकडी कढी हा खास माझ्या सासरचा पदार्थ आहे...मी माझ्या सासूबाईंचं बघून ही कढी शिकले😊एकदम Best लागते ही अशी कढी😋..त्यानिमित्ताने काकडी पण पोटात जाते..आणि काकडीची खमंग चव त्या काढीत उतरते आणि त्यातून या कढी सोबत तळणीची मिर्ची असेल तर कामच झाले..एकदम झक्कास Combination. 😋👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वेळ 10ते 12 मिनटं
  1. 1काकडी साल काढूूून किसलेली
  2. 50 ग्रॅमदही
  3. 25 ग्रॅमडाळीचे पीठ
  4. 2 कपपाणी
  5. 1हिरवी मिरची
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 7-8कढीपत्ता पाने
  9. 1 टीस्पूनकोथिंबीर
  10. 4 tbspसाजुक तूप
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 टीस्पून साखर

कुकिंग सूचना

वेळ 10ते 12 मिनटं
  1. 1

    कढी च्या साहित्याचा फोटो. एका पातेल्यात किसलेली काकडी,दही,डाळीचे पीठ,मीठ, साखर,चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे

  2. 2

    वरील मिश्रणात 2कप पाणी घालून कढी मंद आचेवर 5 ते 7 मिनिट उकळून घ्यावी..जेणेकरून त्यात काकडीचा स्वाद उतरेल

  3. 3

    वरील उकळलेल्या काकडी कढीला..तूप,जीरे,हिंग आणि कढीपत्ता ची फोडणी देणे..आणि 2 ते 3 मिनटं उकळून घेणे

  4. 4

    अश्या प्रकारे झटपट काकडी कढी तय्यार..ही कढी गरम गरम भात आणि तळणीच्या मिरची सोबत सर्व्ह करावी..नुसती प्यायला सुध्दा छान लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes