बालुशाही (balushahi recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#week8
#रेसिपीबुक
आम्ही दोघीच बहिणी आहोत आणि भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतो. यावर्षी मी भारताबाहेर lockdown मुळे अडकले असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी यादिवशी तिच्या आवडीचा पदार्थ केला "बालुशाही" आणि आमच्या आठवणी काढत सण साजरा केला!!!🙂

बालुशाही (balushahi recipe in marathi)

#week8
#रेसिपीबुक
आम्ही दोघीच बहिणी आहोत आणि भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतो. यावर्षी मी भारताबाहेर lockdown मुळे अडकले असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी यादिवशी तिच्या आवडीचा पदार्थ केला "बालुशाही" आणि आमच्या आठवणी काढत सण साजरा केला!!!🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. १.५ कप मैदा
  2. 1 टे स्पून साखर
  3. 1 टीस्पूनबेकींग सोडा
  4. 2 टे स्पून तूप
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2 कपदही
  7. 1/4 कपपाणी
  8. तेल तळण्यासाठी
  9. 1/2 कपसाखर पाकासाठी
  10. 1/4 कपपाणी पाकासाठी
  11. 4-5केसर काड्या पाकासाठी
  12. ड्राय फ्रूट आवडीनुसार

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    बाउलमध्ये मैदा, मीठ, साखर, बेकींग सोडा, तूप,दही व पाणी घालून मिक्स करून गोळा करून घ्या.

  2. 2

    १५ मिनिटांसाठी ओलसर फडक्याने झाकून ठेवावा.

  3. 3

    तेल गरम करायला ठेऊन द्या व तोवर पाक करून घेऊया. त्यासाठी साखर,केसर व पाणी हलवून घ्या व ५-८ मिनिटांसाठी उकळून घ्या. पाक तयार आहे.

  4. 4

    आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला मध्यभागी किंचित होल पाडून बालुशाही चा आकार देऊन घ्या. दोन्ही बाजूंनी बारीक गॅस वर तळून घ्या.

  5. 5

    आता बालुशाही दोन्ही बाजूंनी पाकात ५ मिनिटे बुडवून ठेवा. बालुशाही तयार आहे.

  6. 6

    वरुन ड्राय फ्रूट टाकून सर्व्ह करा. अत्यंत चविष्ट अशी बालुशाही तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

Similar Recipes