रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम मैदा
  2. १२५ ग्रॅम डाळीचे पीठ
  3. ५० ग्रॅम पातळ डालड्याचे मोहन
  4. 1 टेबलस्पूनबडीशेप
  5. 1 चमचागरम मसाला
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1/2 चमचासाखर
  8. 1/2 चमचामीठ
  9. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा, मीठ व गरम डालडा एकत्र करून पिठासारखे पीठ भिजवून ठेवले. बडीशेप कोरडीच भाजून घेतली व बाजुला ठेवली. तेलावर डाळीचे पीठ चांगले भाजून घेतले.

  2. 2

    खंमग वास आला की उतरवावे. मग त्यात बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, तिखट, साखर घालुन एकजीव करून सारण तयार केले. गॅसवर कढईत तेल तापत ठेवले.

  3. 3

    मेद्याच्या पुरीसाठी करतो तेवढ्या लाट्या लाटून घेतल्या. सारणाचे सुद्धा तेवढे गोळे करून प्रत्येक लाटीमधे एक एक सारणाचा गोळा घालून मोदकाप्रमाणे बंद करावी.नंतर हलक्या हाताने पुन्हा सारण भरलेल्या गोळ्यांची वाटी करावी.अश्या चार वाट्या झाल्या की तापलेले तेल खाली उतरवून त्यात घातलया.

  4. 4

    कढई जमिनीवरच असावी.जरा वेळाने बुडबुडे थांबले की कढई गॅसवर ठेवावी. झाऱ्याने तेल उडवून कचोरी तळावी. पुरिप्रमाने छान फुलते. दोन्ही कडून लालसर झाली की उतरवावी. अश्याप्रकारे सर्व कचोऱ्या तळाव्या, व गरमागरम सर्व्ह कराव्या बेसन कचोरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रेसिपी शीर्षक मधला # काढा

Similar Recipes