तांदळाचे बोंडं

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#अंजली
तांदळाचे बोंडं
ही रेसिपी म्हणजे माझ्या माहेरचा वारसा
अंजली म्हणजे माझी आई तिच्याबद्दल काय सांगायचे काल माझ्या बहिणीने म्हणजेच अंकिताने तिच्याबद्दल इतकं लिहिलं की आता मी काय लिहू हा मला प्रश्न पडला आहे़।
तिच्यामुळे मी प्रेरित झाले या कूक पॅडवर रेसिपी लिहिण्याकरिता,
आता रेसिपी बद्दल सांगायच तर ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकली... आजी तर नाही राहिली आता पण तीनी शिकवलेले बर्‍याच काही गोष्टी बऱ्याच काही रेसिपीज ती मलाच फक्त शिकवून गेली कारण शाळेतून आल्यानंतर मी तीचे डोके खायची, "आजी मी हे करेल मला तुझ्यासारखे बनवायला शिकवं मला तुझ्यासारखे बनवायला शिकवं" आणि बरेच या गोष्टी ती मला शिकवून गेली म्हणून म्हणते ही रेसिपी म्हणजे माझ्या माहेरचा वारसा हा मला माझ्या आजीने शिकवलेला पदार्थ मी पहिल्यांदा ट्राय केला आणि सक्सेसफुल झाला।
माहेरुनं लेक निघते सासरी जायला तिची ओटी भरते आई तांदळाने... म्हणूनच मी ही ईथे माझ्या रेसिपी मधे तांदळाचे ओटीचा उल्लेख करते।

सुवासिनीची ओटी,हा स्त्री चा सन्मान ..
ओटीतल्या तांदळाचे बोंडं ,माझ्या माहेरची म्हणजेच माया या विदर्भाची शान ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपतांदळाचे पिठ
  3. 1/2 कपकणीक
  4. 1/2 कपआंबट दही
  5. 2 टीस्पूनदाणे मेथी
  6. 1टिस्पून तीळ
  7. 1 टी स्पूनओवा
  8. 1 टीस्पूनआलं मिरची लसूण कोथिंबीर पेस्ट
  9. 1टिस्पून साखर
  10. 1टिस्पून तिखट
  11. 1 टी स्पूनधणेपूड
  12. 1/2 चमचाहळद
  13. कडीपत्ता हाताने कुस्करून
  14. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ आणि दाणे मेथी हे थोडं आसट भातासारखा कुकरमध्ये शिजवून घ्या
    ते शिजवून झाल्यानंतर थोडं कुकर थंड झाल्यावर ते मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्या

  2. 2

    आता बारीक केलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढा त्यात कणीक,तांदळाचे पिठ, दही, तीळ, ओवा,साखर, आलं मिरची लसूण कोथिंबीर पेस्ट,कडीपत्ता,तिखट धणेपूड,हळद आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करा

  3. 3

    सगळं मिश्रण एकजीव झालंतर आता पटकन कढईत तेल तापवायला ठेवा आणि छान हात ओला करून गोल-गोल असे बोंड त्यात मस्त खमंग तळून काढा।

  4. 4

    चल आता या बरं पटकन हळदी कुंकू लावते तांदळाचे ओटी भरते आणि तांदळाचे बोंड पण खाऊ घालते।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes