सुका जवळा भाजी

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

मासे मिळाले नाही की सुके मासे मदतीला धावून येतात, याची चव जरा उग्र असली तरी भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर असा अडल्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या सुक्या मासळीचा एक आवडता प्रकार... जवळा.

सुका जवळा भाजी

मासे मिळाले नाही की सुके मासे मदतीला धावून येतात, याची चव जरा उग्र असली तरी भाकरी बरोबर खूप छान लागतात. तर असा अडल्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या सुक्या मासळीचा एक आवडता प्रकार... जवळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. वाटीभर सुका जवळा
  2. बारीक चिरलेला कांदे
  3. लहान बारीक चिरलेल्या सिमला मिरच्या
  4. बारीक चिरलेले टोमॅटो
  5. १ टेबलस्पून आले - लसणाची पेस्ट
  6. १ टीस्पून लाल तिखट
  7. अर्धा टीस्पून हळद
  8. चवीनुसार मीठ
  9. २ टेबलस्पून चिंचेचा कोळ
  10. २ टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    जवळा स्वच्छ धऊन पाण्यात भिजत ठेवा.

  2. 2

    एका भांड्यात तेल घालून आले लसूण पेस्ट घाला.

  3. 3

    मग त्यात चिरलेला कांदा परतून घ्या, त्यानंतर चिरलेले टोमॅटो आणि मिरची घाला. सर्व भाज्या थोड्या परतून घ्या.

  4. 4

    मग त्यात भिजवलेला जवळा घालून मिश्रण चांगले परतून घ्या. यावर झाकण ठेऊन थोडावेळ शिजू द्या.

  5. 5

    ५ मिनिटानंतर चिंचेचा कोळ घालून पुन्हा ५ मिनिटे चांगले शिजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes