कुकिंग सूचना
- 1
नुसती कढी म्हटली तरी आवडते. पण त्यात पकोडे असतील तर? एकदम सगळे खुश. आज आपण बघुया कढी पकोडे. इथे आहे लागणारी सामग्री.
- 2
प्रथम ताक तयार ठेवावे. जर नसेल तर दह्यात पाणी घालून ताक करून घ्यावे.
- 3
त्यात तांदूळ पीठ घालून गुठळ्या फोडाव्यात. आणि मीठ घालून बाजूला ठेवावे.
- 4
पकोडे करण्यासाठी डाळीच्या पीठमध्ये ओवा, मीठ, लाल तिखट आणि थोडे तेल घालून एकत्र करावे. मग त्यात पाणी घालावे. हे पीठ भजिसरखे इतके पातळ नसावे.
- 5
तो पर्यंत तेल तापायला ठेवून त्यात छोटे छोटे पकोडे सोडावेत.
- 6
पकोडे छान गुलाबीसर तळून घ्यावेत.
- 7
तळलेले पकोडे गरम असतानाच मीठ घातलेल्या गरम पाण्यात घालावेत म्हणजे छान मऊ होतील.
- 8
एका कढईमध्ये तेल घेऊन आता कढी साठी फोडणी करायची आहे. त्यात मोहरी, जिरे, लवंग, मिरची, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
- 9
तयार झालेली फोडणी बाजूला ठेवलेल्या ताकात ही फोडणी घालावी. नंतर एक उकळी आणून हलवत रहावे.
- 10
उकळी आल्यानंतर त्यात गरम पाण्यात ठेवलेलं पकोडे घालून २-३ मी उकळी येऊ द्यावी. अशाप्रकारे केलेली पकोड्याची कढी सगळ्यांनाच नक्की आवडेल.
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या