पायनापल शीरा

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#फोटोग्राफी
लॉक डाऊन मुळे बाजारात अननस मिळाला नाही .पण घरी असलेला पायनापल क्रश वापरून शीरा केला आहे.

पायनापल शीरा

#फोटोग्राफी
लॉक डाऊन मुळे बाजारात अननस मिळाला नाही .पण घरी असलेला पायनापल क्रश वापरून शीरा केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपरवा
  2. 1/2 कपपायनापल क्रश
  3. 1 (1/2 कप)गरम पाणी
  4. 1/2 कपसाखर
  5. 1/4 कपतूप
  6. 1/4 टीस्पूनपायनापल इसेन्स
  7. चिमूटभरपिवळा रंग
  8. चिमूटभरहिरवा रंग
  9. 1/4 टीस्पूनचॉकलेट सिरप
  10. 5-6मनुका

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईत रवा खमंग भाजून घेतला.मग तुपावर छान परतला.

  2. 2

    त्यात पायनापल क्रश आणि गरम पाणी घालून छान ढवळून घेतला.आणि झाकण ठेऊन शिजू दिला.

  3. 3

    आता त्यात साखर आणि इसेन्स घालून मिक्स केला. साखर वितळून आटेपर्यंत शिजवला.

  4. 4

    शिऱ्या मधील पाव भाग बाजूला केला. तो दुसऱ्या कढईत घेऊन त्यात हिरवा रंग घालून मिक्स केले.

  5. 5

    बाकीच्या भागात पिवळा रंग घालून मिक्स केले.

  6. 6

    आता शीरा तयार झाला आहे. थोडा गार झाल्यावर ताटात अननसाच्या आकारात सजावट केली. चॉकलेट सिरप च्या साहाय्याने त्यावर रेषा काढल्या.आणि मधेमधे अननसाचे डोळे दाखवण्यासाठी त्यावर मनुकांचे तुकडे कापून लावले.व मनुकांवर चॉकलेट सिरप चे थेंब सोडले. पानांचा भाग हिरव्या रंगाच्या शिऱ्याने सजवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes