शिरवळ्या (shirwalya recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#आई
आईबद्दल किती आणि काय सांगायचं...... 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'. आईने आपल्या लेकरांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः कधीही खाल्लेलं मी पाहिलं नाही. आईला काय आवडतं.. हा विचारच कधी आला नाही. पण आज ही पारंपरिक रेसिपी रसातल्या शेवया म्हणजेच शिरवळ्या तिलाच समर्पित.....

शिरवळ्या (shirwalya recipe in marathi)

#आई
आईबद्दल किती आणि काय सांगायचं...... 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'. आईने आपल्या लेकरांना खाऊ घातल्याशिवाय स्वतः कधीही खाल्लेलं मी पाहिलं नाही. आईला काय आवडतं.. हा विचारच कधी आला नाही. पण आज ही पारंपरिक रेसिपी रसातल्या शेवया म्हणजेच शिरवळ्या तिलाच समर्पित.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
५ जण
  1. शेवया बनविण्यासाठी :
  2. 1 कपतांदळाचे पीठ
  3. 1 कपपाणी
  4. चवीनुसारमीठ
  5. रस बनविण्यासाठी
  6. 2 कपओले खोबरे खवलेले
  7. 1 कपगुळ
  8. 1टिस्पून जिरे
  9. 1/4टिस्पून हळद
  10. वेलचीपूड

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम ओले खोबरे, जिरे, हळद, पाणी घालून मिक्सरवर फिरवा. गाळणीतून रस गाळून घ्या नंतर त्या रसात गुळ घाला. गुळ विरघळेपर्यंत ढवळा. नंतर वेलचीपूड घाला. हा रस तयार झाला.

  2. 2

    टोपात पाणी, मीठ घालून गरम करा, उकळी आली की तांदळाचे पीठ घाला आणि चमच्याने सतत ढवळा. झाकण ठेवून उकड काढा (मोदकाप्रमाणे). नंतर परातीत घेऊन हाताला तूप लावून गरम गरम मळा.

  3. 3

    त्याचे छोटे छोटे लांबट गोळे बनवून घ्या. भांड्यात पाणी गरम करून त्यात हे गोळे १० मिनिटे शिजवून घ्या. नंतर एक एक गोळा सेव करायच्या सोऱ्यात घालून चाळणी उलटी ठेवून त्यावर शेव पाडा.

  4. 4

    अशा ह्या शेवया नारळाच्या रसाबरोबर सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes