ड्रायफ्रुट्स यम्मी बिस्कीट (DRYFRUIT BISCUITS RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

मुलांचा रात्री गोंधळ चालु होता की बिस्कीट करt,
मग विचार केला की चला बिस्किट करूया...
पस्तीस वर्षांपूर्वी मी छोटासा बेकिंग चा क्लास केला होता,,
अगदी तेव्हा नवीन नवीन बेकिंग सुरू झाले होते,,
आणि मी क्लासला जाणे सुरु केले...
पहिला दिवस पार पडला...
आणि मॅडमनी शिकवलेले बिस्किट मी घरी आणले आणि ते सगळ्यांना आवडलं,,
माझ्या बाबांना भारी कौतुक माझं...
आता दुसऱ्या दिवशी मी क्लासला गेले, आमच्या मॅडम ने आम्हाला केक शिकविला,, आम्हाला मॅडम जे जे शिकवायच्या ते ते टेस्ट करायला घरच्यांसाठी द्यायच्या,,
आता केकचे पीस घेऊन मी घरी आली,,
आणि हे काय,,
चक्क बाबांनी माझ्यासाठी रेमसन कंपनीचा ओवन आणला...
पस्तीस वर्षापूर्वी ओव्हन घरी आला,, ओ माय गॉड,,
काय माझा आनंद त्यावेळेला!!! गगनात मावेनासा झाला,,,
कारण त्यावेळेला ओवन घरी म्हणजे खूप नवलाई ची गोष्ट होती,,,
त्यावेळेला मी त्याच्यामध्ये केक, बिस्कीट ,नानखटाई वेगवेगळ्या प्रकारचे बेकिंग चे पदार्थ खूप जास्त केले,,,
मी काही केलं की बाबांना खूप आवडायचं,,
आणि बाबा खुप कौतुक करायचे,,, म्हणून माझाही उत्साह वाढायचा,,,
असे आमचे बाबा, सर्व गोष्टींची त्यांना खूप भारी आवड,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
4 सर्व्हिंग्ज

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    एका बाउलमध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये पिठीसाखर घालून ते चांगलं फेटावे,,

  2. 2

    आता त्याच सारणामध्ये चाळणीने गाळून घेतलेला मैदा घालावा,, आणि त्याला चांगलं मळून त्याचा गोळा करून घेणे,,

  3. 3

    आता त्याचे छोटे-छोटे मनाप्रमाणे बिस्किट तयार करा...त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचे छोटे छोटे बिस्किट बनवा,
    वेगवेगळे आकार तुम्ही त्याला देऊ शकता...
    हलक्या हाताने ते बिस्कीट तयार करायची आहे कारण जर का तुम्ही जोरात दाबून बिस्किट बनवले तर ते तुटून जातील.. आता त्याला ड्रायफ्रुट्स ने सजवा

  4. 4

    आणि हे मायक्रोवेव मध्ये एक पंचवीस ते तीस मिनिटासाठी कन्वेक्शन मोडवर 160 डिग्रीवर बेक करून घ्यावेत...

  5. 5

    आता मायक्रोवेव मधून बिस्किट बाहेर काढण्याची घाई करू नये..
    त्याला छान थंडगार होऊ द्यावे..
    मगच मुलांना खायला द्यावे..
    कारण गरम खाल्ले तर त्याची टेस्ट तेवढी चांगल लागणार नाही
    म्हणून बेक केल्यावर आरामात थंड होऊन नंतर खाल्ले तर त्याची टेस्ट खूप छान लागतात,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes