स्टफ्ड नान (stuffed naan recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cooksnap (Hema Vernekar) हेमा वेर्णेकर ह्यांंची स्टफ नान रेसिपी बनवली. अश्या पद्धतिने बनवलेले पदार्थ मुलंंदेखिल आवडीने खातात.

स्टफ्ड नान (stuffed naan recipe in marathi)

#cooksnap (Hema Vernekar) हेमा वेर्णेकर ह्यांंची स्टफ नान रेसिपी बनवली. अश्या पद्धतिने बनवलेले पदार्थ मुलंंदेखिल आवडीने खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमगहुचे पिठ
  2. 100 ग्रॅममैदा
  3. 1सिमला मिरची
  4. 1कांंदा
  5. 1टोमॅटो
  6. 100 ग्रॅमपनीर
  7. 1 वाटीतेल
  8. 2 टेबलस्पुनकसुरी मेथी
  9. 2 टेबलस्पुनदही
  10. 2 टेबलस्पुनकाळे तीळ
  11. 1 टिस्पुनहळद
  12. 1 टिस्पुनलालतिखट
  13. 1 टेबलस्पुनआले लसुण पेस्ट
  14. 1 टिस्पुनबेकिंंग सोडा
  15. मीठ

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    एका भांंड्यात गहुचे पिठ, मैदा, मिठ, 2 चमचे तेल,बेकिंंग सोडा, दही घालुन एकत्र मिसळावे. आवश्यकतेनुसार पाणी घालुन पिठ कालवावे. झाकुन ठेवावे

  2. 2

    कांंदा,टोमॅटो,सिमला मिरची बारिक कापुन घ्यावे. एका पातेल्यात तेल गरम करावे. त्यात कसुरी मेथी, कांंदा परतुन घ्यावा. टोमॅटो, सिमला मिरची घालुन परतावे. लालतिखट,हळद, मीठ,आले लसुण पेस्ट घालुन परतावे. पनीर कुस्करुन घालावा.सर्व एकत्र छान परतुन घ्यावे.मिश्रण थंड करावे.

  3. 3

    मळलेल्या पिठाचा गोळा घ्यावा. त्याची वाटी बनवुन आतमध्ये पनीर चे मिश्रण भरावे. हळुहळु हाताने पारी लाटावी. वरुन काळे तीळ लावुन पसरावे. लाटणी ने हळुहळु लाटावे.

  4. 4

    तवा गरम करावा. स्टफ़्ड नान तव्यावर भाजावा. दोन्ही बाजुने तेल लावुन भाजावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

Similar Recipes