कांदा साबुदाणा उसळ (kanda sabudana usal recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#फोटोग्राफी
ह्या उसळी मागे एक गमतीशीर गोष्ट आहे, माझी आई एक निवृत्त शिक्षिका आहे जेव्हा ती नौकरी करत होती तेव्हाचा हा प्रसंग. आई ला एकदा संध्याकाळी तिच्या सहकर्मी देशपांडे मैडम कडे जायचे होते तर त्यांनी नास्त्यची तैय्यरी केली पण काही कारणा स्तव आईचे जाणे नाही झाले तेव्हा फोन ची सुविधा नसल्याने कळवता नाही आले. दुसर्या दिवशी शाळेत भेटल्यावर देशपांडे मैडम ने आईला सांगितले की ती येणार म्हणून जो नास्त्या साठी साबूदाणा भिजव्लेला होता त्याची कांदा टमाटा घालुन केलेली उसळ मुलांनी "आशा मावशी की जय" म्हणत म्हणत फस्त केली...
तिच ही कान्दा टोमैटो साबूदाणा उसळ माझ्या माहेरी देशपांडे ची उसळ म्हणून प्रसिद्ध आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 110 ग्रॅमसाबुदाणा 2 ते 3 तास भिजव्लेला
  2. 50 ग्रॅमशेगदाणा कूट
  3. 1मोठा कांदा
  4. 1 छोटाटोमैटो (ओप्शनल)
  5. 1 1/2 टीस्पूनसाखर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 2 टीस्पूनजीरे
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1/4 टीस्पूनहळद(रांगा साठी)
  13. 1/2लींबू चा रस

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम साबुदाणा व दाण्याचा कूट एकत्र करुन घ्या म्हणजे साबुदाणा छान मोकळा होइल, एकी कडे कढईत तेल गरम करुन त्यात जीरे हिंग आणी मिर्ची परतून घ्या.

  2. 2

    मिर्ची खमंग परतली की त्यात कांदा घालुन लाल होई पर्यंत परता मग त्यात कूट लावलेला साबुदाणा ताका व सोबतच मीठ, साखर, लींबू रस, आणी आमचुर पावडर घालुन छान परत व एक वाफ आणावी. नंतर वाटल्यास टमाटा टाका (आधी टाकला तर उसळ ओलसर होइल) व छान वाफ येऊ द्या व नन्तर गैस बन्द करा

  3. 3

    उसळी ची वाफ दबली की कैरी, कांदा व खोबरा किस नी सजवावे व थंडगार ताका सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes