बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते.

बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)

#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
  1. 1 कपबीट उकडून चिरलेले
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/2 टीस्पूनतिखट
  6. 4-5कडीपत्ता पाने
  7. चिमूटभरहिंग
  8. 1/2 टीस्पूनमीठ....आवडीनुसार कमी जास्त
  9. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  10. 1/4 कपखवलेला नारळ

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    बीट उकडून,त्याची साले काढून बारीक तुकडे करून घेतले.कोथिंबीर चिरून घेतली.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी तयार केली.

  3. 3

    फोडणी छान खमंग तयार झाली की त्यात चिरलेले बीटाचे तुकडे,हळद,तिखट,मीठ घालून नीट मिक्स करून परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात खवलेला नारळ,चिरलेली कोथिंबीर घालून परतून दोन तीन मिनिटे मंद गॅसवर ठेवले.

  5. 5

    तयार भाजी सर्व्हिंग बाउल मध्ये काढली. खाण्यासाठी तयार आहे चविष्ट अशी बीटाची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes