रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ?

रसरशीत मसाला कारली (Masala Karli Recipe In Marathi)

#BKR नेहमी आपण पाणी न टाकता वाफेवरची कारल्याची भाजी करतो. खेडेगावात शेतांमध्ये कारल्याच्या वेली असतात. ताजी ताजी कारली आणून त्याची रसरशीत मसाला कारली बनवतात. खूपच कमी इन्ग्रेडियंट मध्ये भाजी तयार होते . मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे खेडेगावी गेले होते व तिथे ही भाजी खाल्ली व मनाला खूपच भावली. पाहुयात कशी बनवायची ते ?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमकारली
  2. दीड इंच चिंचेचा तुकडा
  3. 50 ग्रॅमगुळ
  4. 1/2 टीस्पूनकाळा मसाला
  5. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  8. 1 टीस्पूनमोठे मीठ
  9. 6-7कढिपत्ता पाने
  10. 1/4 टीस्पूनबारीक मीठ
  11. 2 टीस्पूनफोडणीसाठी तूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कारली स्वच्छ धुऊन घ्या. सुरीने मध्यभागी छेद देऊन मीडियम साईज चे तुकडे करा.

  2. 2

    तुकड्यांमध्ये थोडेसे मोठे मीठ भरून घ्या. तयार तुकड्यांचे भांडे कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करा.

  3. 3

    कुकर थंड झाल्यावर भांडे बाहेर काढा व एक एक तुकडा हातात घेऊन अलगदपणे दाबून त्यातील पाणी काढून घ्या. म्हणजे खारटपणा राहात नाही.

  4. 4

    गॅस वर एका कढईत दोन टीस्पून तूप टाकून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता टाकून फोडणी करून घ्या. नंतर त्यात काळा मसाला, लाल तिखट, हळद, धने-जीरे पावडर, चिंचेचा बुटुक, गूळ टाकून परतून घ्या.

  5. 5

    नंतर त्यात शिजवलेल्या कारल्याच्या फोडी टाका व अर्धी वाटी पाणी टाकून तीन ते चार मिनिटे उकळून घ्या. चवीपुरते मीठ टाकून झाकून ठेवा.

  6. 6

    अशा प्रकारे आपली आगळीवेगळी कमी इन्ग्रेडियंट मध्ये रसरशीत मसाला कारल्याची भाजी तयार.... सर्व्ह करताना - यासोबत गरम गरम भाकरी किंवा पोळी भन्नाट लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes