कोथिंबीरीच्या देठांची चटणी (kothimbirichya dethachi chutney recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

आज जागतिक पितृदिनानिमित्त स्व.बाबांना आवडणारी, त्यांना समर्पित ही चटपटीत चटणी ..
कोंड्याचा मांडा ,त्यांचा हातखंडा ..

कोथिंबीरीच्या देठांची चटणी (kothimbirichya dethachi chutney recipe in marathi)

आज जागतिक पितृदिनानिमित्त स्व.बाबांना आवडणारी, त्यांना समर्पित ही चटपटीत चटणी ..
कोंड्याचा मांडा ,त्यांचा हातखंडा ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमकोथिंबिरीची कोवळी देठं
  2. 1लिंबाचा रस
  3. 8लसूण पाकळ्या
  4. 15 ते 20 कढीपत्त्याची पाने
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. 1 टेबल स्पूनशेंगदाणे
  7. 1 टेबल स्पूनफुटाण्याच्या डाळ्या
  8. 1 टेबल स्पूनखोबऱ्याचे तुकडे
  9. 1/2 टी स्पूनमीठ
  10. 1/2 टी स्पूनसाखर
  11. 1/2 टीस्पूनजिरे मोहरी
  12. 1 टीस्पूनतेल
  13. 1 पिंचहिंग
  14. 1/ 2लाल मिरच्या तडक्या साठी

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    कोथिंबीरीची देठं, कढीपत्ता व मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं,मोहरी,लाल मिरच्या हिंग वगळून सर्व साहित्य एकत्र घालावे.

  2. 2

    वरील भांड्यातील मिश्रण वाटून घ्यावे.आवश्यकतेनुसार घट्ट पातळ करण्यासाठी आपल्याला पाणी वापरायचे आहे, लिंबाचा रस सुद्धा आपल्याला वाटतानाच घालायचा आहे.लिंबाच्या रसामुळे चटणी दिवसभर फसफसत नाही आणि रंग सुद्धा टिकतो.

  3. 3

    अगदी कमी तेलाची ची फोडणी करण्यासाठी छोट्या कढईमध्ये जिरे मोहरी लाल मिरची व हिंग कडकडीत फोडणी करून वरील चटणी मध्ये मिक्स करावी,ही चटणी जेवताना किंवा दाक्षिणात्य पदार्थांसोबत सुद्धा अतिशय उत्तम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes