सांज सवेर (kofta recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#रेसिपीबुक #week1
माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सांज सवेरा. खूप आधी मी रेसिपी बद्दल ऐकले होते. रेसिपी खूप सर्च केल्यानंतर मला हवी ती रेसिपी मिळाली. घरी पहिल्यांदा ट्राय केले आणि रिझल्ट अगदी अफलातून होता. मग काय ही रेसिपी माझ्या आवडत्या रेसिपी मध्ये समाविष्ट झाली.
म्हणूनच तुमच्यासाठी खास रेसिपी मी लिहीत आहे. एक छोटासा प्रयत्न काहीतरी नवीन करण्याचा थोडी वेळखाऊ आहे साहित्य ही खूप आहे पण रिझल्ट अगदी अफलातून आहे नक्की करून पहा.

सांज सवेर (kofta recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सांज सवेरा. खूप आधी मी रेसिपी बद्दल ऐकले होते. रेसिपी खूप सर्च केल्यानंतर मला हवी ती रेसिपी मिळाली. घरी पहिल्यांदा ट्राय केले आणि रिझल्ट अगदी अफलातून होता. मग काय ही रेसिपी माझ्या आवडत्या रेसिपी मध्ये समाविष्ट झाली.
म्हणूनच तुमच्यासाठी खास रेसिपी मी लिहीत आहे. एक छोटासा प्रयत्न काहीतरी नवीन करण्याचा थोडी वेळखाऊ आहे साहित्य ही खूप आहे पण रिझल्ट अगदी अफलातून आहे नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयारी ३० मिनटे/ कुकिंग ३० मिनिटे
४ माणसे
  1. पालक बॉल साठी
  2. 1 टेबल स्पूनतेल
  3. 1 टेबल स्पूनआले-लसूण पेस्ट
  4. 2हिरव्या मिरच्या चा ठेचा
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 कपपालकाची प्युरी
  7. 1/4 चमचाकाळी मिरी पूड
  8. 1 टेबल स्पूनभाजलेलं जीरे पूड
  9. 1/2 कपबेसन
  10. 1 टेबलस्पून धण्याची पावडर
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. 1 टेबल स्पूनकॉर्नफ्लोअर
  13. 2 टेबलस्पूनमैदा कोफ्ता गोळण्यासाठी
  14. 1/2 कपपनीर
  15. 1 टेबल स्पूनआमचूर पावडर
  16. 1/2 टी स्पूनवेलची पावडर
  17. ग्रेव्हीसाठी साहित्य
  18. 1 टेबलस्पूनबटर
  19. 1 टीस्पूनजिरे
  20. 1कांदा चिरलेला
  21. 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  22. 2कश्मीरी लाल मिरच्या
  23. 1/4 कपकाजू
  24. 3टोमॅटो
  25. 1 टीस्पूनधण्याची पूड
  26. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  27. 1 टी स्पूनगरम मसाला पावडर
  28. 1तमालपत्र
  29. 2हिरव्या वेलची
  30. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  31. 1/2 टेबल स्पूनमध
  32. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

तयारी ३० मिनटे/ कुकिंग ३० मिनिटे
  1. 1

    चला तर मग बनवूया सांज सवेरा. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्या व उकळत्या पाण्यामध्ये एक दोन मिनिटं वाफवून थंड पाण्यामध्ये काढून ठेवा. पालकाला हातामध्ये चांगले मळून घेऊन मिक्सरमध्ये त्याची पेस्ट वाटून घ्या. पालकांमध्ये पाणी असता कामा नये नाहीतर कॉफ्ते होणार नाहीत.

  2. 2

    पॅनमध्ये एक टीस्पून बटर टाकावे.बटर गरम झाले की त्यामध्ये झिरो फोडणी द्यावी जिरे तडतडले की त्यामध्ये आले-लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घ्यावा. आले लसूण चांगले परतले की त्यामध्ये पालकाची पेस्ट टाकावे व एक दोन मिनिटं ते परतून घ्यावे. ते परतून झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे थोडे मीठ धणेपूड बेसन फ्लावर हे सर्व टाकून पालकाची पेस्ट एक जीव करावी.दोन मिनिटं हे सगळे मिश्रण पॅनमध्ये चांगले परतून घ्यावे व पालकांचा गोळा तयार झाला की तो बाजूला काढून थंड करून ठेवावा

  3. 3

    पनीर हाताने कुस्करून घ्यावे त्यामध्येआमचूर पावडर कॉर्नफ्लॉवर चवीप्रमाणे थोडीशी मीठ व वेलची पूड टाकून त्यामुळे एकजीव करावे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. पालकाचे मिश्रण थंड करून घ्यावी त्याचा तुम्हाला कोफ्ता हवा आहे म्हणजे लिंबाएवढा मोठा गोळा घेऊन हातावर ती जप्त करून घ्यावा पनीरचे छोटा बॉल त्याच्या आत ठेवावा. चारी बाजूंनी बंद करून त्याचा एक किफ्टा बॉल तयार करावा.

  4. 4

    सर्व बॉल तयार करून घ्यावे व गरम तेलामध्ये मध्यम आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यावेत.

  5. 5

    खूप जास्त भाजू नये नाहीतर पालकाचे वरचे आवरण कडू लागेल.

  6. 6

    आता ग्रेव्हीसाठी पॅनमध्ये उरलेले सर्व बटर टाकावे त्यामध्ये झिरो फोन्स द्यावे त्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा टाकावा कांदा थोडा लालसर परतून झाले की त्यामध्ये कापलेले टोमॅटो टाकावे त्यामुळे थोडे मोठे झाले की बाकी मसाले म्हणजे धने-जिरे पूड लाल तिखट चवीप्रमाणे मीठ कसुरी मेथी

  7. 7

    आता पॅनमध्ये एक टीस्पून तेल टाकावे व त्यामध्ये दोन वेळच्या आणि एक तमालपत्र टाकावी आणि त्याच्यावर हि प्युरी ओतावी. आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकावे. एक टेबल फोन क्रीम टाकून ग्रेव्ही चांगली उकळी येऊ द्यावी. शेवटी त्यामध्ये मध टाकावे. आता आपण जे कोफ्ते केले आहेत ते मधून कापावे आणि प्लेटमध्ये म्हणजे ग्रेव्ही सर्व्ह करावी आणि त्यावर ते अर्धे कापलेले कोणते प्लेस करावे. नंतर त्यावर कोथिंबीर आणि क्रिम टाकुन सजवून गरमागरम सांज सवेरे पराठा नान किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes