चना करी (chana curry recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#दक्षिण #केरळ चनाकरी ( केडला करी ) केरळ मधील सर्वच गोड तिखट रेसिपीत सढळ हाताने ओल्या नारळाचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीची चनाकरी आज मी बनवली आहे चला बघुया

चना करी (chana curry recipe in marathi)

#दक्षिण #केरळ चनाकरी ( केडला करी ) केरळ मधील सर्वच गोड तिखट रेसिपीत सढळ हाताने ओल्या नारळाचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीची चनाकरी आज मी बनवली आहे चला बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 ते1 तास
2-4 व्यक्तिसाठी
  1. 110ग्रॅम मोड आलेले चणे
  2. 2 कांदे उभे चिरलेले
  3. 2-3 हिरव्या मिरच्या
  4. 1-2 टीस्पूनआल्याचे तुकडे
  5. 1-2 टेबलस्पुनओल्या नारळाचे तुकडे
  6. 2-4लसुण पाकळ्या
  7. 2 टेबलस्पुनधने पावडर
  8. 1-2 टेबलस्पुनतिखट
  9. 1 टेबलस्पुनबडिशोप
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 12-15मिरीचे दाणे
  13. 2 टेबलस्पुनओल्या नारळाचे तुकडे
  14. 2-4 टेबलस्पुनउकडलेले चणे
  15. चविनुसार मीठ
  16. 2-3 टेबलस्पुनतेल
  17. 15कडिपत्याची पाने
  18. 1 टीस्पूनमोहरी
  19. 1-2लाल सुक्या मिरच्या
  20. 1पिंच हिंग

कुकिंग सूचना

1/2 ते1 तास
  1. 1

    चणे7-8 तास भिजवुन नंतर रुमालात बांधुन ठेवा दुसऱ्या दिवशी छान मोड येतील चनाकरी साठी लागणारे साहित्य डिश मध्ये काढुन ठेवा

  2. 2

    छोटया कुकरमध्ये मोड आलेले चणे उभे चिरलेले कांदे मिरच्या चे तुकडेआलं लसुण पाकळ्या ओल्या खोबर्‍याचे तुकडे मीठ कडिपत्ता 2 कप पाणी घालुन5-6 शिट्टया करून घ्या व थंड झाल्यावर झाकण उघडा

  3. 3

    पॅनमध्ये कोरडे मसाले थोडे परतुन घ्या व थंड करा मिक्सर जारमध्ये भाजलेले मसाले ओल खोबर्याचे तुकडे व शिजवलेले थोडे चणे टाकुन मिरी सर्व पाणी टाकुन फिरवुन घ्या

  4. 4

    तयार पेस्ट करून घ्या

  5. 5

    कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी कडिपत्ता हिंग लालमिरच्या टाकुन परता नंतर त्यात तयार केलेली पेस्ट टाकुन परता नंतर मीठ टाकुन परता

  6. 6

    शिजलेल्या पेस्टमध्ये उकडलेले चणे कांदयाचे मिश्रण टाकुन परता व झाकण ठेवुन चना करी शिजवा (2-5 मिनिटे) नंतर गॅस बंद करून झाकण तसेच 5-10 मिनिटे ठेवा

  7. 7

    आपली चना करी रेडी

  8. 8

    तयार चनाकरी बाउलमध्ये सर्व्ह करा थोडे कांदा स्लाइज कडिपत्ता ओलखोबर्याच्या तुकडयाने डेकोरेट करा व चना करी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes