सातू पीठाचे लाडू (satu che pithache ladoo recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठ

सातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.

सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.

४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून , १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.
तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.

मी आज तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 hours
3 members
  1. २५०ग्रामसातू पीठ
  2. २०० ग्रामपिट्ठी साखर
  3. १७० ते २०० ग्राम १७० ते २०० ग्राम तूप
  4. 1 छोट्या वाटीभर बदाम, पिस्त्याचे काप
  5. ७-८ विलायचेची पूड

कुकिंग सूचना

1 hours
  1. 1

    प्रथम गरम कढईत तूप गरम करून पिघळून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यात सातू पीठ मिक्स करून लगातार गैस च्या मंद आचेवर हलकेसे ६ ते ७ मिनिटे परतून घ्या.त्याचा खूप छान सुगंध येतो. गॅस बन्द करा आणि मिश्रण ठंड होऊ द्या.

  2. 2

    मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर ७-८ विलायचेची पूड, काजू, बदाम, पिस्त्याचे काप छोट्या वाटीभर टाकून सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. लाडू बनविण्यासाठी मिश्रण तयार झाले.

  3. 3

    मिश्रणाला थोडे थोडे हातात घ्या आणि त्याचे तुमच्या आवडत्या आकाराचे लाडू बांधा वर चारोळी किंवा पिस्त्याने सजवा.

  4. 4

    टीप:- गरम सातू पिठात लगेच पिट्ठी साखर मिसळायची नाही. कारण असे केल्यावर मिश्रण पातळ होते आणि लाडू बांधने मुश्किल होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes