चंद्रकोर रवा कटलेट (rava cutlets recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#रेसिपीबुक #week6
आजपर्यंत आपण चंद्रावर बरीच गाणी, कविता ऐकल्या असतील, बहुतेकांनी कविता तयारही केल्या असतील किंबहुना आपल्या बुद्धिमत्तेला चालना देऊन गाणी तयार ही केली असतील. पण पहिल्यांदाच चंद्रकोर आकाराची रेसिपी व्वा! काय कल्पना? मस्तच थीम होय ना !!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 servings
  1. 100 ग्रामबारीक रवा
  2. 1/4 कपब्रेड क्रम्स
  3. 1/4 कपशिमला मिरची बारीक चिरून
  4. 1/4 कपगाजर बारीक चिरून
  5. 1कांदा बारीक चिरून
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टेबलस्पूनचिलीफ्लेक्स
  8. तळण्यासाठी तेल
  9. ओला नारळाचा सजविण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र केली. एका कढईत पाणी घालून, त्याला उकळी आली की, त्यात मीठ आणि सर्व भाज्या, चिलीफ्लेक्स घातले. 2 मिनिटांनी त्यात रवा घातला.

  2. 2

    रवा घातल्यावर सतत हलवून, रवा शिजवुन घेतला पाणी आटे पर्यंत. पाणी आटले की, गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवले 5 मिनिट झाकून ठेवले. नंतर मिश्रण एका थाळीत काढून पुन्हा हातानी चांगले मिक्स केले.

  3. 3

    आणि चंद्रकोर, चांदणी आकारात कटलेट करून घेतले. ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेतले.

  4. 4

    आणि गरम तेलात खरपूस तळून घेतले. काही कटलेट न तळता नारळाचे किस लावून सर्व्ह केले आवडतात अशेच आवडतात म्हणून.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

Similar Recipes