व्हेज पफ (VEG PUFFS RECIPE IN MARATHI)

Madhura Shinde
Madhura Shinde @cook_24245744
Mumbai

एक चंद्रकोर प्रकार गोड केल्यावर मी दुसरा प्रकार तिखट करायचा ठरवला. घरी भरपूर भाज्या असल्यामुळे मी मिक्स व्हेग पफ बनवले. #week6 #रेसिपीबुक थीम : चंद्रकोर

व्हेज पफ (VEG PUFFS RECIPE IN MARATHI)

एक चंद्रकोर प्रकार गोड केल्यावर मी दुसरा प्रकार तिखट करायचा ठरवला. घरी भरपूर भाज्या असल्यामुळे मी मिक्स व्हेग पफ बनवले. #week6 #रेसिपीबुक थीम : चंद्रकोर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिंस
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमैदा
  2. 1मोठी वाटी कोबी,गाजर, आणि भोपळी मिरची
  3. 2-3 चमचेमिरची लसूण पेस्ट
  4. 1 चमचाटोमॅटो सॉस,शेझवान सॉस आणि सोय सॉस
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 छोटाकांदा

कुकिंग सूचना

45 मिंस
  1. 1

    एक वाटी मैदा थोडे तूप,मीठ व पाणी घालून.. मळून घ्या.

  2. 2

    कांदा,कोबी, गाजर व भोपळी मिरची मिक्सर मध्ये बारीक करा. भाजितले पाणी काढून घ्या..

  3. 3

    कढईत तेल तापवा.. हिरवी मिरची व लसूण पेस्ट फ्राय करून घ्या.. त्यात भाज्या टाका.. टोमॅटो सॉस, शेझवान सॉस व सोय सॉस टाकून परतून घ्या.. नंतर थोडे मीठ टाकून झाल्यावर आपले सारण तयार.

  4. 4

    पिठाची उभी चपाती लाटून घ्या.. मध्ये सारण भरून हवा त्या शेप मध्ये फोल्ड करा. मी चंद्रकोर शेप दिला आहे.

  5. 5

    गरम तेलात फ्राय करून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhura Shinde
Madhura Shinde @cook_24245744
रोजी
Mumbai

Similar Recipes