ब्रेड रवा सँडविच (bread rava sandwich recipe in marathi)

MaithilI Mahajan Jain
MaithilI Mahajan Jain @cook_25276308

#रेसिपीबुक
#week5
#पावसाळीगंमत
पावसाळा म्हंटल की गरमा गरम पकोडे,समोसे, वडे अस काही आपल्याला खाण्याची इच्छा होत असते.
छान बाहेर पाऊस सुरू असला की फरमाइश झालीच पाहिजे.त्यात आता लॉक डाऊन मध्ये बाहेर कुठे जाण्याची सोयच उरली नाही,त्यात सगळे बंद मग काय सगळ काही घरीच सुरू..मग तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो ..नाही? म्हणूनच थोड वेगळं काहीतरी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २० मिनिट्
३ते४ लोकांसााठी
  1. १५ ते २० ब्रेडस्लाइस
  2. 200 ग्रॅमरवा
  3. 100 एम एलदही
  4. 100 एम एलमलाई
  5. 2कांदे
  6. 2टोमॅटो
  7. 4/5हिरवी मिरची
  8. 1/2 कपकोथिंबीर
  9. 1 टिस्पून हळद
  10. तिखट मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिट्
  1. 1

    सर्व प्रथम ब्रेड स्लाइस चे चार साइड काढून घ्यावेत.

  2. 2

    त्यानंतर वरील साहित्य म्हणजेच रवा,मलाई,दही,मीठ, हळद,तिखट एकत्र मिक्स करावे.

  3. 3

    नॉनस्टीक पॅन किंवा तवा गरम करावा,आणि ब्रेड च्या एक स्लाइस ला रव्याचे केलेले मिश्रण लावावे व त्यावर कांदा टोमॅटो, मिरची,कोथिंबीर टाकून पॅन च्या साइड ने टाकावे,मलाई मुळे तेल,किंवा तुपाची गरज नाही.

  4. 4

    ब्रेड च्या दुसऱ्या बाजूने पण सेम प्रोसिजर.दोन्ही साइड नी छान भाजून झाले की आपले ब्रेड रवा सँडविच तयार.आपण ते टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो किंवा गरमा गरम चहा सोबत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
MaithilI Mahajan Jain
MaithilI Mahajan Jain @cook_25276308
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes