रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#hs
#साप्ताहिक सूप प्लॅनर

सोमवार - टोमॅटो सूप

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ सर्व्हिंग
  1. 5-6 लालबुंद टोमॅटो चिरून
  2. 1/4 कपबीटरूटचे काप
  3. 5लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनआलं
  5. 1/2 टीस्पूनकाळिमिरी पूड
  6. 1कांदा चिरून
  7. मीठ चवीनुसार
  8. चिमूटभरचिली फ्लेक्स
  9. 1 टेबलस्पूनबटर
  10. 1 (1/2 कप)पाणी
  11. तमालपत्र,
  12. लवंग,
  13. दालचिनी तुकडा
  14. 1 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  15. 1 टेबलस्पूनकाॅर्नफ्लोअर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    बटर गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी,लवंग परतून घ्या.

  2. 2

    कांदा, टोमॅटो आलं लसूण घालून परतून घ्या. व ५ मि.झाकण लावून टोमॅटो,मीठ छान शिजू‌ द्या.

  3. 3

    मिश्रण थंड करून घ्या. व च
    मिक्सरमध्ये बारीक वाटून चाळून घ्या.

  4. 4

    तयार मिश्रण कढईत गरम करायला ठेवा. व वरून काळिमिरी पूड,चिली फ्लेक्स घालून मिश्रण १० मि.छान उकळू द्यावे.

  5. 5

    काॅर्नफ्लोअर मधे पाणी घालून मिश्रण छान मिक्स करून आणखी ५ मि.सूप शिजू द्यावे. वरून क्रिमने गारनीश करावे. व ब्रेड क्रुटाॅन सोबत गरमागरम सूप वाढावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes