वडीच्या अळूच्या  देठाचे रायते - विस्मृतीत गेलेली डिश (aloochya dethache rayate recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week7

आम्ही वाडवळ, फुलांच्या आणि भाज्यांची वाडी करणारे. आमच्या परिसरातील इतर बहुतेक समाज पुर्वी शेतीवरच विसंबून होते. शेतकरी असल्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाची कदर करणारे. खाण्यायोग्य वस्तू वाया जाणार नाही याची काळजी घरोघरच्या गृहिणी घेत आल्या आहेत. यातुनच बनलीही डिश, "वडीच्या अळुच्या देठाचे रायते - एक विस्मृतीत गेलेली डिश..."
माझ्या आजेसासूबाई, ज्यांचे माहेर 'नाळा' या गावी (आताच्या वसई-विरार महापालिकेतील नालासोपारा स्टेशनपासून पश्चिमेला) होते. त्यांच्या लहानपणी त्या ही रेसिपी शेजारच्या सामवेदी कुटुंबाकडून शिकल्या होत्या. त्यांच्याकडून माझ्या सासूबाईंकडे व सासूबाईंकडुन माझ्यापर्यंतही रेसिपी आली आहे. मी आनंदाने ही रेसिपी सर्वांसोबत शेअर करत आहे. जिथे हेतू "शुद्ध" तो पदार्थ "सात्विक".
दोन प्रकारच्या अळूच्या पानांचा खाण्यामधे वापर केला जातो. एक हिरव्या देठांचा जो भाजीसाठी जो भाजीसाठी वापरला जातो आणि दुसरा काळपट हिरव्या रंगाचे देठ असलेला जो अळूवडीसाठी वापरला जातो. भाजीच्या अळूच्या देठाने घशात खवखवू शकते, त्यामुळे अळूवडीच्या पानांचेच देठ या रेसिपीसाठी वापरावे. आधी सांगितल्या प्रमाणे काही वाया जावू नये या विचारातून ही भन्नाट रेसिपी बनली आहे. यामुळे पानांची अळूवडी केल्यावर त्यांचे देठ वाया जात नाहीत. सादर आहे 'वडीच्या अळूच्या देठांचे रायते' ही सात्विक रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
3 जणांसाठी
  1. 1 कपवडीच्या अळूचे देठ
  2. 1/2 कपदही
  3. 1मिरची (बारीक चिरलेली)
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टेबलस्पूनमोहरी (मिक्सरमध्ये बारीक करून घेणे)
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. बारीक चिरलेलीकोथिंबीर
  8. फोडणीसाठी तेल
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. अळूच्या देठाचे लहान (साधारणपणे एक इंच) तुकडे करून ते धुऊन घ्यावे आणि ते कुकरमध्ये पाणी न घालता वाफवून घ्यावे.(अळूचे देठ त्याच्यात असलेल्या पाण्यामध्येच शिजतात. एक शिटी पुरेशी होते).

  2. 2

    वाटलेली मोहरी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात अगदी जरासे तेल घालून चांगले फेटून घ्यावे. आता फोडणीचे भांडे गॅस वर ठेऊन तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालावे. तडतडले की हिंग व मिरची घालावी. गॅस बंद करावा. व गरम फोडणी फेटलेल्या मोहरीवर टाकावी. व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात दही घालून नीट मिक्स करावे. त्यात वाफवलेले अळूचे देठ घालावेत. चवीनुसार मीठ घालावे. आणि थोडी कोथिंबीर घालून छान मिक्स करावे. कोथिंबीरीने गार्निश करून सर्व्ह करावे वडीच्या अळूच्या देठाचे रायते!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes