पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#shravanqueen
#cooksnap
Supriya Vartak Mohite ताईंनी छान पारंपारिक रेसिपी शिकवली. आमच्याकडे ही रेसिपी कधीच केली गेली नव्हती.
या रेसिपी पासून परत एक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला.
थँक्यू ताई या छान रेसिपीसाठी.
चला तर बनवूया पुरणाचे दिंडे.

पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)

#shravanqueen
#cooksnap
Supriya Vartak Mohite ताईंनी छान पारंपारिक रेसिपी शिकवली. आमच्याकडे ही रेसिपी कधीच केली गेली नव्हती.
या रेसिपी पासून परत एक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला.
थँक्यू ताई या छान रेसिपीसाठी.
चला तर बनवूया पुरणाचे दिंडे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/2 कपचणाडाळ
  2. 1 कपसाखर
  3. 1 चिमूटकेसर
  4. 2 कपकणिक
  5. 1 चिमूटमीठ
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 5-6 थेंबखाण्याचा लाल रंग

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    सर्वप्रथम चणाडाळ चार ते पाच तास भिजू द्यावे व भिजल्यानंतर त्याला कुकरमध्ये तीन ते चार शिट्या होऊ द्याव्या.डाळ शिजल्यानंतर त्याला चाळणी च्या मदतीने त्यातले पाणी काढून घ्यावे.
    एक कढई गॅसवर ठेवावे व त्यात तूप टाकावे.
    तूप हलके गरम झाल्यानंतर त्यात शिजलेली डाळ सोडावी.मॅशर किंवा क्रशर च्या मदतीने डाळ व्यवस्थित क्रश करून घ्यावी व डाळ घट्ट होऊ द्यावे.

  2. 2

    डाळ घट्ट झाल्यानंतर त्यात साखर व केसर टाकावे.
    साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडे पातळ होईल पण हे मिश्रण सतत हलवत रहावे.
    मिश्रण घट्ट होईस्तोवर चमच्याने हलवत रहावे व पाच ते दहा मिनिटात आपले पूरण तयार होऊन जाणार.

  3. 3

    पुरण शिजत असतानाच एकीकडे कणीक, मीठ, लाल रंग व तेल एकत्रित मळून घ्यावे.
    व ही भिजलेली कणीक दहा मिनिटे सेट होऊ द्यावी.
    दहा मिनिटे झाल्या नंतर या कणकेचे छोटे गोळे करून घ्यावे.
    एक गोळा घ्यावा व त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी.

  4. 4

    या लाटलेल्या पोळीवर एक चमचा पुरण ठेवावे व पोळीला चारी बाजूने बंद करून घ्यावे.
    असेच सगळे दिंडे भरून घ्यावे.
    एकीकडे कुकर मध्ये पाणी ठेवून वरती चाळणी ठेवावी.
    या चाळणीला तेलाने ग्रीसिंग करून घ्यावे.
    स्टीमींग साठी सर्व दिंडे या चाळणीवर ठेवावे.
    व कुकर चे झाकण लावून घ्यावे.
    कुकरची शिट्टी व रिंग काढून घ्यावे.
    दहा मिनिटे स्टीम होऊ द्यावे.
    गरम गरम दिंडे रेडी आहेत व तुपासोबत उत्तम लागतील.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes