उपवासाचे साबुदाणा सुप... (sabudana soup recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#सूप
उपवास म्हंटला की काहीतरी हलकं खावेसे वाटते. बर्‍याच वेळा उपवासाच्या पदार्थ, किंवा तेलकट वडे वगैरे खाले की पोटाला त्रास होतो. मग अशा वेळेस गरमा गरम पण तेवढेच हेल्दी.. तब्येतीला फायदेशीर.. आणि छोटी छोटी भुक भागवण्यासाठी हे साबुदाणा सूप 🥣 उपयुक्त ठरते... 💃💕

उपवासाचे साबुदाणा सुप... (sabudana soup recipe in marathi)

#सूप
उपवास म्हंटला की काहीतरी हलकं खावेसे वाटते. बर्‍याच वेळा उपवासाच्या पदार्थ, किंवा तेलकट वडे वगैरे खाले की पोटाला त्रास होतो. मग अशा वेळेस गरमा गरम पण तेवढेच हेल्दी.. तब्येतीला फायदेशीर.. आणि छोटी छोटी भुक भागवण्यासाठी हे साबुदाणा सूप 🥣 उपयुक्त ठरते... 💃💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 10 ग्रामभिजवलेला साबुदाणा
  2. 2शिजलेले पोटॅटो
  3. 1 टेबलस्पूनजिरे
  4. चवीनुसारमीठ
  5. 1टेबलस्पून तूप
  6. 2-3टेबलस्पून शेंगदाणे
  7. 4-5 हिरव्या मिरच्या
  8. 1/2 इंच अद्रक
  9. 1/2 वाटीदही
  10. वाटीभर कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    साबुदाणा पाच ते सहा तास भिजत घाला म्हणजे तो चांगला सॉफ्ट होतो.

  2. 2

    आता एक पॅन घ्या. त्यामध्ये तूप घाला. त्यात चौकोनी कापलेले पोटॅटो चे काप घालून थोडे शालो फ्राय करून घ्या. गोल्डन कलर येईस्तोवर फाय करून ते बाजूला काढून ठेवा.

  3. 3

    मिक्सर चे पाॅट घ्या त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, उकडून घेतलेला अर्धा पोटॅटो घाला व मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या. नंतर यात साखर आणि दही घालून एक सेकंद परत भिरवून घ्या.

  4. 4

    आता पॅनमध्ये अर्धा टीस्पून तूप घाला. त्यामध्ये जिरे घाला, जिरे तडतडले की शेंगदाणे घाला. आता आपण जी पेस्ट केली ती घाला एक सेकंद चांगले परतून घ्या. नंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घाला व त्यात भिजवलेला साबुदाणा घालून चवीनुसार मीठ घाला. एक उकळी येऊ द्या (तुम्हाला जर सूप पातळ किंवा दाटसर हवे असेल तर त्यात पाणी आपल्या सोयीनुसार कमी जास्त करु शकता.) साबुदाणा वरती आला की आपले साबुदाणा सूप तयार झाले असे समजायचे.

  5. 5

    तयार आहे आपले गरमा गरम उपवासाचे साबुदाणा सुप. हे सूप सर्व्ह करताना वरुन पोटॅटो चे शॅलो फ्राय केलेले काप घाला. व आस्वाद घ्या.. साबुदाणा सुप चा.. 💃💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes