उपवासाच्या भरल्या मिरच्या (upwasachya bharlya mirchya recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक #week7
#सात्विकरेसिपीज

श्रावण महिन्यात साधे सात्विक जेवण जेवायचे ते पावसाळ्यात मंद झालेली पचनसंस्था सांभाळण्यासाठी,पण तरीही जिभेचे चोचले आणि पावसाळी थंड हवा काहितरी चमचमीत मागणी करतच असतात.

मग काय?या दिवसात मिळणाऱ्या या लांबूळक्या पोपटी रंगांच्या मिरच्या कमी तिखट असतात. दाण्याचं कूट,तीळकूट आणि कोणतंही उपासाला चालणारं पीठ वापरून या मिरच्या करता येतात.मी भगर पीठ वापरलं आहे.

चला तर घ्या साहित्य जमवायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
7 सर्व्हिंग्ज
  1. 7कमी तिखट हिरव्या मिरच्या
  2. 20 ग्रॅमदाण्याचं कूट
  3. 10 ग्रॅमतिळाचं कूट
  4. 50 ग्रॅमराजगिरा/भगर/साबुदाणा पीठ
  5. 5 ग्रॅमहळदपूड
  6. 10 ग्रॅमलाल मिरचीपूड
  7. 10 ग्रॅमआमचूरपूड
  8. 5 ग्रॅमजिरे
  9. 30 ग्रॅमतेल
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मिरच्या देठासह धुवून,निथळून, एक चीर द्या.

  2. 2

    थोड्या तेलावर अर्धे जिरे,हळदपूड, यांची फोडणी करून राजगिरा/भगर/साबुदाणा पीठ परतून घ्या,त्यात बाकीचे साहित्य घालून दोन मिनिटे परता.

  3. 3

    थंड करा आणि मिरच्यांमध्ये दाबून भरा.

  4. 4

    उरले तेल पसरट भांड्यात गरम करून त्यात उरलेले जिरे घालून फोडणी करा.

  5. 5

    मिरच्या त्यात ठेऊन पाच मिनिटे मंद आचेवर झाकून शिजवा.

  6. 6

    पाच मिनिटांनी परता आणि अरत परत करून सर्व बाजूनी परतून घ्या.

  7. 7

    गरमागरम भगर भात, किंवा आमटी भात,दहीभात,ताक भात यांच्यासोबत आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes