स्वामीनारायण सात्विक खिचडी (swaminarayan satvik khichadi recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

स्वामीनारायण सात्विक खिचडी (swaminarayan satvik khichadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
5 माणसे
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1/2 कपमुगाची डाळ
  3. 1/4 वाटीहिरवा वाटाणा
  4. 1/4 वाटीफ्लॉवर
  5. 1/4 वाटीगाजर तुकडे
  6. 1/4 वाटीबटाट्याचे तुकडे
  7. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची आलं पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टेबल स्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1/4 चमचाहिंग
  12. 4 टेबलस्पूनसाजूक तूप
  13. 2लाल मिरच्या
  14. 5 कपगरम पाणी
  15. लिंबाएवढा चिंचेचा गोळा
  16. 1 टेबल स्पूनगुळ
  17. गरम मसाला
  18. 4लवंगा
  19. 2तमालपत्र
  20. 2 छोटावेलची
  21. 1मोठी वेलची
  22. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  23. 4काळी मीरी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुऊन एका तासभर भिजत ठेवावे. आलं आणि मिरचीची पेस्ट करून घ्यावी. गूळ चिंचेचे पाणी तयार करून ठेवावे. ज्या मापाने तुम्ही तांदूळ घेतला आहे त्याच मापाने पाचपट पाणी घेऊन ते गरम करून घ्यावे. खिचडी असते त्यामुळे पाणी थोडे जास्त लागतं.

  2. 2

    पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप टाकावे, तूप गरम झाले की त्यामध्ये जिर्‍याची फोडणी द्यावी जिरे तडतडले की मग त्यामध्ये गरम मसाला हींग टाकून थोडे परतून घ्यावे मग त्यामध्ये मिरची आल्याची पेस्ट टाकावी ती सुद्धा चांगली परतून घ्यावी मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकावा थोडा मऊ झाला की मग त्यामध्ये कापून ठेवलेल्या सर्व भाज्या टाकून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    दोन मिनिटं गॅस मंद करून भाजी शिजू द्यावी.भाजी थोडी शिजली की मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ टाकून तेसुद्धा भाजी मध्ये छान मिक्स करून घ्यावे मग त्यामध्ये गरम पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकावे आणि खिचडी शिजायला ठेवावी. खिचडीतले पाणी आटत आले की मग त्यामध्ये चिंचगुळाचे पाणी आपल्या आवडीनुसार,धने पूड, गरम मसाला पूड, टाकून गॅस मंद करून कढईवर झाकण ठेवून खिचडी चांगली शिजू द्यावी. सात ते आठ मिनिटे नंतर झाकण काढून पाहावे आणि खिचडी माऊ झाली की नाही ते पहावे.

  4. 4

    खिचडी शिजल्यानंतर फोडणी पात्रांमध्ये एक चमचा तूप टाकावे, तूप गरम झाले की त्यामध्ये जीरे लाल मिरच्या टाकून ही फोडणी खिचडीवर ओतावी. गरमागरम खिचडी ताकाच्या कडी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

Similar Recipes