नैवेद्याची खिचडी (khichadi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week7
सात्विक रेसिपी २
भारत हा उत्सव,श्रद्धा यांचा मिलाप असलेला देश आहे. जितकी विविधता भाषा, पोशाख तितकीच विविधता श्रद्धास्थानांमध्येही आढळते. विविध जाती-जमातीच्या नागरिकांची श्रद्धास्थानं भारतभर विखुरलेली आहेत. या प्रत्येकाच्या प्रथा-परंपराही खूप भिन्न आहेत. श्रद्धा,भक्तीभावही अपार. तर अशा या श्रद्धास्थानांची प्रतीकं म्हणजेच भारतातील विविध देव-देवतांची मंदिरं. अतिप्राचीन, मध्यमयुगीन आणि समकालीन मंदिरांचा हा देश. षोडपचारे पूजन,अभिषेक,आरती यानंतर वेळ येते ती नैवेद्याची. भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. बहुतेक मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते. म्हणूनच प्रसादाच्या पदार्थांमध्ये भरपूर विविधता आढळते. बहुतेक मंदिरांमध्ये नैवेद्यासाठी बिना कांदा लसूण खिचडी बनवली जाते. प्रसाद म्हणून ती भक्तांना दिली जाते. आज मी ओडीसाच्या मंदिरांमध्ये नैवेद्य म्हणून जी खिचडी बनवली जाते त्याची रेसिपी शेअर करतेय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ माणसे
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 1/4 कपमुगाची डाळ
  3. 1टोमॅटो
  4. 1गाजर
  5. 1बटाटा
  6. 1/4 कपमटारचे दाणे
  7. 1/4 कपफरसबी बारीक चिरलेली
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1 टेबलस्पूनधणे जिरे पूड
  11. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  12. 1टिस्पून हळद
  13. 2हिरव्या मिरच्या
  14. 2सुक्या लाल मिरच्या
  15. 1 टेबलस्पूनजिरं
  16. 1 इंचकिसलेलं आलं
  17. चवीनुसारमीठ
  18. 1 1/2 कपगरम पाणी
  19. खडे मसाले::
  20. 2तमालपत्रे
  21. 2हिरव्या वेलच्या
  22. 1दालचिनीचा तुकडा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यातील पाणी काढून गाळून घ्या. पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या. गाजर, बटाटा सोलून त्यांचे चौकोनी तुकडे करून घ्या. फरसबी,टोमॅटो बारीक चिरून घ्या. सर्व मसाले, तेल आणि तूप एका प्लेटमध्ये काढून घ्या.

  2. 2

    पंधरा मिनिटांनी गॅसवर कूकर गरम करून घ्या. तेल टाकून जिरे टाका. मग सर्व खडे मसाले टाकून मंद आचेवर परतून घ्या. हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या टाका. टोमॅटो टाकून परतून घ्या. टोमॅटो नरम झाल्यावर हळद घालून मिक्स करा. सर्व भाज्या घालून परतून घ्या.

  3. 3

    मग तांदूळ आणि डाळ टाकून परतून घ्या. तूप घालून मिश्रण एकजीव करा. गरम मसाला, धणे जिरे पूड घालून २-३ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. एक कप गरम पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून कूकर बंद करून दोन शिट्ट्या करा.

  4. 4

    झाली नैवेद्याची सात्विक खिचडी तयार. कूकर थंड झाल्यावर बाऊल मध्ये खिचडी काढून वरती तूप टाकून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या (6)

Similar Recipes