खतखत (khatkhat recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#shravanqueen
#post4
खतखत हा पदार्थ मी प्रथमच ऐकला आणि केला सुध्धा. पण आपल्या ऑर्थर दिपाली मुनशिन मुळे मला आज ही नवीन रेसिपी शिकायला मिळाली. भरपूर भाज्या , डाळ असल्यामुळे फारच पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. भात, पोळी कशा बरोबरही मस्त लागते.

खतखत (khatkhat recipe in marathi)

#shravanqueen
#post4
खतखत हा पदार्थ मी प्रथमच ऐकला आणि केला सुध्धा. पण आपल्या ऑर्थर दिपाली मुनशिन मुळे मला आज ही नवीन रेसिपी शिकायला मिळाली. भरपूर भाज्या , डाळ असल्यामुळे फारच पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. भात, पोळी कशा बरोबरही मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ सर्व्हिंग
  1. तुकडे४/५ फ्लॉवर चे
  2. 3तोंडली
  3. 1 टेबलस्पूनगाजर बारीक चिरून
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1बटाटा बारीक चिरून
  6. 2 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  7. 1/4 कपदूध चिरून
  8. 2 टेबलस्पूनग्रीन बीन्स बारीक चिरलेली
  9. 1 कपतुरीच्या डाळीचे साधं वरण
  10. 1/4 कपचिरलेले कॉर्न
  11. 1 टेबलस्पूनकच्चे दाणे
  12. 1/2 कपखोवलेला नारळ
  13. 1 टेबलस्पूनचिंचेची पेस्ट
  14. 1 टेबलस्पूनहळद
  15. 1पिनच हिंग
  16. 1 टेबलस्पूनतेल
  17. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  18. 1 टीस्पूनमोहरी आणि जिरे मिक्स

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात डाळ, कॉर्न चे तुकडे आणि कच्चे दाणे शिजवुन घ्यावे. मग सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.

  2. 2

    मग एका पॅन मध्ये फोडणी करीन त्यात आधी बटाटा घालावा तो चांगला शिजला की मग एक एक करून सर्व भाज्या घालाव्या व थोडे मीठ घालावे व झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

  3. 3

    मग मिक्सर मध्ये खोवलेला नारळ व चिंच घालून पेस्ट करून घ्यावी. मग शिजलेली डाळ, कॉर्न व दाणे भाज्यांन मध्ये मिक्स करावे. थोडे पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे व एक उकळी यावू द्यावी. मग वाटलेला नारळ घालावा व ५ मिनिटांनी गॅस घालवावा. वरून चिरलेली कोथींबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Similar Recipes