मिश्र पिठाचे तिरंगी आप्पे (MISHRA PITHACHE APPE RECIPE IN MARATHI)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या 🇮🇳
आज या विशेष दिनानिमित्त मी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या पीठां पासून हे तिरंगी आप्पे बनविण्याचा प्रयत्न केला आहे. यात मी कुठल्याही फूड कलर चा वापर न करता.. भाज्यांपासून हे कलर बनवून त्यामध्ये घातले. चवीला छान आणि दिसायलाही मस्त असे हे आप्पे तयार झाले....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-7मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 5 टेबलस्पूनकणिक
  2. 5 टेबलस्पूनबेसन
  3. 5 टेबलस्पूनतांदळाची पिठी
  4. 5 टेबलस्पूनबारीक रवा
  5. 3 टेबलस्पूनमैदा
  6. लाल कलर साठी
  7. 1/2टोमॅटो
  8. 1बेडगी मिरची
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. हिरवा कलर साठी
  11. 2तोंडली
  12. 2भेंडी
  13. 1कारल्याचा तुकडा
  14. 1हिरवी मिरची
  15. चवीनुसारमीठ
  16. 6 टेबल स्पूनतेल
  17. 4कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

5-7मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व पीठ व रवा एकत्र करून त्यात गरजेनुसार पाणी व मीठ घालून १५ मिनिटे भिजत ठेवावे.

  2. 2

    नंतर लाल व हिरवा कलर बनविण्यासाठी मिक्सर मधून टोमॅटो लाल मिरची, लाल तिखट यांची पेस्ट बनवून घ्यावी. हिरव्या कलर साठी मी घरातील हिरव्या भाज्यांचा वापर केला. त्यात तोंडली, भेंडी व कारल्याचा एक छोटा तुकडा व मिरची, कडीपत्ता मिक्सर मधून वाटून घेतला

  3. 3

    आता वरील दोन्ही रंग दोन मिश्रणात घालून. तीन प्रकारची कलर फुल मिश्रणे तयार केली

  4. 4

    आप्पे पत्रात तेलाचा थेंब सोडून ते गरम केले. व मिश्रण घातले. आप्पे शिजत आल्यावर ते उलटून घेतले व दुसरी बाजू शिजल्यावर गॅस बंद करून ते एका प्लेट मध्ये काढले... अशाप्रकारे हे तिरंगी आप्पे तयार झाले..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes