पिझ्झा विथ व्हाईट & रेड सॉस विदाऊट ओवन (no oven pizza recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#noovenbaking
या रेसिपी मध्ये आपण विदाऊट ओवन पिझ्झा कसे बनवायचा ते बघणार आहोत त्यासोबतच आपण व्हाईट आणि रेड सॉस देखील करणार आहोत.

पिझ्झा विथ व्हाईट & रेड सॉस विदाऊट ओवन (no oven pizza recipe in marathi)

#noovenbaking
या रेसिपी मध्ये आपण विदाऊट ओवन पिझ्झा कसे बनवायचा ते बघणार आहोत त्यासोबतच आपण व्हाईट आणि रेड सॉस देखील करणार आहोत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. बेस बनवण्यासाठी
  2. 2 कपगव्हाचे पीठ किंवा मैदा
  3. 3/4 कपदही
  4. 1 चमचामीठ
  5. 1/2 चमचाबेकिंग सोडा
  6. 2 चमचेतेल
  7. रेड सॉस बनवण्यासाठी
  8. 4टोमॅटो बारीक चिरलेले
  9. 1कांदा बारीक चिरलेला
  10. 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  11. 3/4टोमॅटो केचप
  12. 1 चमचालाल तिखट
  13. 1/2 चमचाओवा
  14. 1 चमचामीठ
  15. 2 चमचेतेल
  16. व्हाईट सॉस बनवण्यासाठी
  17. 1/2 कपमैदा
  18. 1 कपदूध
  19. 1/2 कपकिसलेले चीज
  20. 1 चमचातूप
  21. 1/2 चमचामीठ
  22. टॉपिंग बनवण्यासाठी
  23. लांब चिरलेला कांदा
  24. लांब चिरलेली सिमला मिरची
  25. चिली फ्लेक्स
  26. ओवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    पिठामध्ये मीठ, बेकिंग सोडा आणि तेल टाकुन चांगले मिक्स करा, मग दही टाकून कणीक मळून घ्या, तयार कणिक दहा मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    आता आपण रेड सॉस बनवूयात, सर्वप्रथम एका भांड्यात तेल तापवून त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून चांगले परतून घ्या, त्यात कांदा टाकून परतून घ्या.

  3. 3

    कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो टाका आणि पाच मिनिटे शिजवा,आता त्यात लाल तिखट टोमॅटो केचप आणि मीठ टाका

  4. 4

    ओवा घालून टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्या. शिजवून झाल्यावर ब्लेंडर च्या साह्याने प्युरी करून घ्या.आपला रेड पिझ्झा सॉस तयार आहे.

  5. 5

    आता आपण व्हाईट सॉस बनवूयात,पॅनमध्ये तूप गरम करून घ्या, त्यात मैदा टाकून ढवळत चांगला परतून घ्या,

  6. 6

    मैदा परतल्यानंतर त्यात दूध टाकून चांगले मिक्स करा जेणेकरून त्यात गाठी तयार होणार नाही (जरी गाठी तयार झाल्या तरी हरकत नाही हे मिश्रण एका गाळणीने चांगले गाळून घ्या म्हणजे त्या गाठी निघून जातील). मिक्स केल्यानंतर हे मिश्रण पाच ते सात मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात किसलेले चीज आणि मीठ टाकून दोन मिनिटे शिजवा. आपल्या आवडीनुसार तुम्ही त्यात दूध ऍड करू शकता.आपला व्हाइट सॉस तयार आहे.

  7. 7

    आता तयार कणकेचे तीन गोडे बनवा आणि लाटून घ्या, त्याला काट्याच्या साह्याने होल करा, एका कढईत तळाला मीठ टाकून त्यात स्टॅंडवर एक प्लेट ठेवून ते फ्री-हीट करून घ्या, त्यावर तयार पिझ्झा बेस ठेवून झाकून दहा ते बारा मिनिटे मध्यम आचेवर बेक करून घ्या.

  8. 8

    तयार पिझ्झा बेसला तेल किंवा तूप लावून आपल्या आवडीनुसार दोन्ही सॉस आणि टॉपिंग लावा वरतुन किसलेले चीज ॲड करा आणि बेस बेक केल्याप्रमाणे बारा ते पंधरा मिनिटे बेक करून घ्या. आणि गरम गरम सर्व करा.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

Similar Recipes