पंचखाद्य् मोदक (pancha khadya modak recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#रेसिपीबुक #week10 #मोदक
Post 2
गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी ‘आज प्रसादाला काय?’ या गोड विषयावर चर्चा होतेच होते. पूजा किंवा आरत्यांनंतर हातावर पडणाऱ्या चमचा-चमचाभर प्रसादाचं अप्रूप अजून कमी झालेलं नाही. पेढे, बर्फी, लाडू, वडय़ा साखरफुटाणे असे गोडाचे कितीतरी पदार्थ प्रसादाच्या ताटात हजेरी लावतात. पण हे पदार्थ आवडले म्हणून फार खाऊन चालत नाहीत. फळांचे तुकडे प्रसादासाठी उत्तम असले तरी ते कापल्यावर पुन्हा ठेवून देता येत नाहीत. अशा वेळी गणपतीच्या प्रसादाचा आणखी एक गोड आणि टिकाऊ पदार्थ मदतीला येतो- तो म्हणजे ‘पंचखाद्य’. अनेक जण त्याला ‘खिरापत’ असेही म्हणतात.सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर असे पाच सुके पदार्थ एकत्र करून हे पंचखाद्य बनवतात. काही जणांकडे त्यात बेदाणेसुद्धा घालतात. आधी चमचाभरच घेतलेला प्रसाद अजून थोडा हवा असे जेव्हा वाटते तेव्हा हे पंचखाद्य मिठाईपेक्षा तुलनेनं चांगला आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पंचखाद्य्याचे मोदक बनवून ठेवले तर आरतीनंतर प्रसाद म्हणून देण्यासाठी खूप सोयीस्कर ठरते. मी खारीक पावडर ऐवजी ओला खजूर घालून मोदक बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
५ माणसे
  1. 1 कपबिया काढलेला खजूर
  2. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 1/4 कपडेसिकेटेड कोकोनट
  4. 1/4 कपकाजू बदाम तुकडे करून
  5. 1 चमचाखसखस
  6. १०० ग्राम मनुका
  7. 1 टेबलस्पूनवेलची जायफळ पूड

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम खजूरच्या बिया काढून घ्या. मोदकासाठी लागणारे बाकीचे साहित्य काढून ठेवा. पॅनमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाले कि खसखस टाकून खमंग भाजून घ्या.

  2. 2

    खसखस चांगली भाजली कि मंद गॅसवर खजूर टाकून परतून घ्या.

  3. 3

    खजूर नरम झाला कि गॅस बंद करा. मग बाकीचे सर्व साहित्य टाकून परतून घ्या. मिश्रण थंड करत ठेवा.

  4. 4

    मिश्रण थोडे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यामध्ये घालून मोदक करून घ्या.

  5. 5

    गणेश चतुर्थीच्या प्रसादाचे मोदक तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes