गहू ज्वारी पीठाच्या टोमॅटो चकल्या (tomato chakali recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

#रेसिपीबुक #week 15 जॉब करत असल्याने चकल्यांची भाजणी म्हणजे खूप कठीण काम. हे पीठ तयार करून 10-15दिवस सहज टिकून राहते. म्हणजेच झटपट चकली बनवून पटकन खायला मिळते.

गहू ज्वारी पीठाच्या टोमॅटो चकल्या (tomato chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 15 जॉब करत असल्याने चकल्यांची भाजणी म्हणजे खूप कठीण काम. हे पीठ तयार करून 10-15दिवस सहज टिकून राहते. म्हणजेच झटपट चकली बनवून पटकन खायला मिळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दीड-दोन तास
20-25 चकल्या
  1. १ वाटी गहूचे पीठ
  2. 1/2 वाटीज्वारीचे पीठ
  3. टोमॅटो
  4. गरजेनुसार पाणी
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनजिरे पावडर
  8. 1 टीस्पूनओवा पावडर
  9. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  10. 2 टीस्पूनतीखट
  11. 1 टीस्पूनधनापावडर
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

दीड-दोन तास
  1. 1

    सर्वप्रथम गहू व ज्वारीचे पीठ एका सुती कापडाने बांधून ३० मि इडली पात्रात वाफवून घ्या. वाफवून थंड झाल्यावर चाळून घ्यावे.हे पीठ १०-१५ दिवस टिकत.

  2. 2

    एका चाळणीत एक टोमॅटो १०मि वाफवून घ्या. थंड झाल्यावर साल काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  3. 3

    आता तयार पीठामध्ये बारीक केलेले टोमॅटो पेस्ट चाळून घ्या. वर दिलेल्या प्रमाणात तीळ हळद तिखट मीठ चवीनुसार जीर पावडर ओवा पावडर धना पावडर एकत्र करून मळून घ्या आवश्यक असल्यास पाणी घाला.

  4. 4

    मळलेले पीठ १०मि झाकून ठेवावे. नंतर एका ताटात सर्वचकल्या पाडून घ्याव्यात आणि तेल गरम करून मंद आचेवर तळून घ्या.

  5. 5

    तयार आहेत गरमागरम टोमॅटो चकली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
रोजी

Similar Recipes