मुगडाळ ज्वारीपीठ मिक्स चकली (moongdal jwari chakali recipe in marathi)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

#रेसिपीबुक #week15 #चकली
बघता बघता रेसिपीबुक week 15 रेसिपी आज तयार झाली
खूप आनंद होत आहे शेवटी रेसिपीबुक week 15 गाठलं मी ते फक्त अंकिता मॅडम मुळे. रेसिपीबुक साठी शेवटी शेवटी चढ उतार आले पण अंकिता मॅडमनी साथ दिली. खूप खूप आभार अंकिता मॅडम
आजची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या सामग्री पासून आणि खुसखुशीत आहे. कमी वेळात बनणारी. नक्की सर्वांनी बनवुन बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपज्वारीचे पीठ
  2. 1 कपमुगडाळ
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/4 टेबलस्पूनहळद
  6. 1/2 टेबलस्पूनधणेपूड
  7. 1/2 टेबलस्पूनजिरं
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम ज्वारीचे पीठ एका सुती कपड्यात बांधून घ्या. मूग डाळ धुऊन कुक्करच्या डब्यात घाला. भिजेल इतकंच पाणी घाला. दुसऱ्या डब्यात ज्वारूचे पीठ बांधलेले गाठोडे ठेवा. आणि कुक्करमध्ये दोन्ही डब्बे ठेऊन 2 शिट्या करून घ्या.कुक्कर थंड झाले की, कपड्यातील पीठ थाळीत काढा.

  2. 2

    आणि हातानी मोकळे करा पीठ. त्यात तूप गरम करून घाला.

  3. 3

    तूप पूर्ण पिठाला चांगले चोळून घ्या. पीठात सर्वमसाले, मीठ, जिरं घालून मिक्स करा.

  4. 4

    आता थोडी कोमट झालेली शिजवुन घेतलेली डाळ घालून पीठ मळून घ्या. गरज असल्यास अगदी थोडस पाणी घाला.

  5. 5

    आता चकलीच्या साच्याला आतून तेलाचा हात लावून त्यात पीठ भरा आणि चकल्या पाडून घ्या.

  6. 6

    गरम तेलात छान तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes