पेसरट्टू विथ अल्लम चटणी (pesarattu with allam chutney recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 3Week3

#Dosa हा किवर्ड ओळखून मी हा डोसा बनवला आहे. पेसरट्टू म्हणजे मूगाचा डोसा... साऊथमध्ये मुगाच्या डोसाला पेसरट्टू म्हटले जाते. यासोबत सर्व्ह केली जाणारी अल्लम चटणी म्हणजे आल्ल्याची चटणी... ही चटणी खूप छान लागते. गोड आंबट अशा चवीची ही चटणी आपल्यासाठी नवीन आहे. पण साऊथमध्ये हा डोसा आणि चरणी प्रसिद्ध आहे सोबत मी आपली नेहमीची खोबऱ्याची चटणीदेखील केली आहे. चला तर मग बघुया याची रेसीपी..

पेसरट्टू विथ अल्लम चटणी (pesarattu with allam chutney recipe in marathi)

#GA4 3Week3

#Dosa हा किवर्ड ओळखून मी हा डोसा बनवला आहे. पेसरट्टू म्हणजे मूगाचा डोसा... साऊथमध्ये मुगाच्या डोसाला पेसरट्टू म्हटले जाते. यासोबत सर्व्ह केली जाणारी अल्लम चटणी म्हणजे आल्ल्याची चटणी... ही चटणी खूप छान लागते. गोड आंबट अशा चवीची ही चटणी आपल्यासाठी नवीन आहे. पण साऊथमध्ये हा डोसा आणि चरणी प्रसिद्ध आहे सोबत मी आपली नेहमीची खोबऱ्याची चटणीदेखील केली आहे. चला तर मग बघुया याची रेसीपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 तास+ १ तास
4 व्यक्तींसाठी
  1. डोसा बॅटरसाठी
  2. 250 ग्रॅममूग
  3. 50 ग्रॅम तांदूळ
  4. 2 टेबलस्पूनउडिद डाळ
  5. 3हिख्या मिरच्या
  6. 1 इंचआल्ले
  7. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  8. चवीपुरते मीठ
  9. आल्लम चटणीसाठी
  10. 3 इंचआल्ले चिरलेले
  11. 1-2लिंबाएवढी चिंच
  12. 2 टेबलस्पूनगूळ
  13. 1 छोटा कांदा चिरलेला
  14. 1 छोटा टोमॅटो चिरलेला
  15. 2फुटाण्याची डाळ
  16. 7-8कढिपत्ता पाने
  17. 1 टीस्पूनमोहरी
  18. चवीपुरते मीठ
  19. खोबऱ्याच्या चटणीसाठी
  20. 1 वाटीआले खोबरे
  21. 2हिख्या मिरच्या तुकडे करून
  22. 8-10लसूण पाकळ्या
  23. 1/2 कांदा चिरलेला
  24. 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ
  25. 1/2 टीस्पूनसाखर
  26. चवीपुरते मीठ
  27. फोडणीसाठी
  28. 2टे स्पून तेल
  29. 1/2 टीस्पूनजीरे
  30. 1/2 टीस्पूनमोहरी
  31. 4-5कढिपत्ता पाने
  32. 2सुक्या लाल मिरच्या

कुकिंग सूचना

6 तास+ १ तास
  1. 1

    प्रथम मूग, तांदूळ, उडिद डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून 6 तास भिजत ठेवा. 6 तासानंतर भिजवलेले धान्य हिरव्या मिरच्या, आल्ले आणि कोथिंबीर घालून मिक्सरमधून वाटत घ्यायचे. मूग भिजेपर्यंत दुसरीकडे चिंच पाण्यात थोडा वेळ भिजवून चिंचेचा कोळ बनवून घ्यायचा.

  2. 2

    नंतर एका कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, कढिपत्ता, कांदा घालून परतून घ्यायचे. मग त्यात आल्ले, फुटाण्याची डाळ, टोमॅटो घालून थोडावेळ परतायचे. मग त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ व थोडे पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करायचे. झाकण लावून 10 मिनिटे शिजवून घ्यायचे. तोपर्यंत थोडे पाणी पण आटते. मग गार झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची.

  3. 3

    आता खोबऱ्याच्या चटणीसाठी मिरची आणि लसूण 2 थेंब तेलात 1 मिनिट परतायचे. गार झाल्यावर खोबऱ्याच्या चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची.

  4. 4

    आता तडका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात 1/4 टी स्पून जीरे मोहरी प्रत्येकी, कढिपता घालून तडतडल्यावर हा तडका अल्लम चरणीवर घालायचा. पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडे तेल गरम करून 1/4 टी स्पून जीरे नोहरी प्रत्येकी, कढिपत्ता, सुक्या लाल मिरच्या घालून तडतडल्यावर हा तडका खोबऱ्याच्या चरणीवर घालायचा.

  5. 5

    आता डोश्याचा तवा गरम करायला ठेवा. तोपर्यंत डोश्याच्या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा. तवा गरम झाल्यावर त्यावर पाण्याचा हबका मारून कापडाने पुसून घ्या. मग एक पळी बॅटर तव्यावर घालून पळीने नेहमीप्रमाणे डोसा तव्यावर पसरून घ्या.

  6. 6

    1 मिनिटांनंतर त्यावर थोडे तेल शिंपडा. गोल्डन ब्राऊन भाजल्यावर गरमागरम दोन्ही चटणीसोबत सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes