खमंग डाळमेथी तडका (dal methi tadka recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GA4
#week19
Keyword - Methi

थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.यात मेथी एक खास पालेभाजी आहे.यात अनेक फायदे लपले आहेत.थंडीच्या दिवसातमधे मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.मेथीच्या पराठ्यापासून ते भाजीपर्यंत.
असाच एक मेथीपासून माझा आवडता पदार्थ मी ,बनवला आहे.
चला तर ,पाहूयात रेसिपी.

खमंग डाळमेथी तडका (dal methi tadka recipe in marathi)

#GA4
#week19
Keyword - Methi

थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.यात मेथी एक खास पालेभाजी आहे.यात अनेक फायदे लपले आहेत.थंडीच्या दिवसातमधे मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.मेथीच्या पराठ्यापासून ते भाजीपर्यंत.
असाच एक मेथीपासून माझा आवडता पदार्थ मी ,बनवला आहे.
चला तर ,पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि.
4 सर्व्हिंग
  1. 1 कपतुरीची डाळ
  2. १/२ कप चणाडाळ (शिजवून)
  3. 1 कपबारीक चिरलेली मेथी
  4. 1कांदा बारीक चिरून
  5. 1टोमॅटो बारीक चिरून
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/2 टीस्पूनधणेपूड
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. कोथिंबीर
  12. आलं लसूण ठेचलेले
  13. जीरे,मोहरी,हिंग
  14. कडिपत्ता
  15. तेल
  16. मीठ चवीनुसार
  17. तडक्यासाठी
  18. 1लाल मिरची,जीरे,ठेचलेला लसूण,काश्मिरी तिखट

कुकिंग सूचना

25 मि.
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग,ठेचलेले आलं लसूण, कडिपत्ता घालून खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा घालून छान परतून सर्व मसाले घालून मिक्स करुन घ्या.

  2. 2

    नंतर टोमॅटो आणि मेथी,मीठ घालून खमंग परतून घ्या. मसाला मेथीला छान लागेपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात शिजवलेली डाळ आणि थोडे पाणी घालून छान मिक्स करून घ्या‌. १५ मि.मंद आचेवर छान शिजू द्या.

  4. 4

    तडक्यासाठी फोडणीपात्रात तूप गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग कडिपत्ता,लसूण,तिखट घालून खमंग फोडणी करून तयार डाळमेथीवर घालून गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes