सिडडू (siddu recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#उत्तर #हिमाचल प्रदेश #
हिमाचल मधील कुल्लु, मनाली येथील ट्रेडिशनल, हेल्दी नाष्टा. हा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो.हा स्टीम वर बनवतात. आज मी ड्राय फ्रुटस चा बनवणार आहे.हा पदार्थ मी पहिल्यांदा बनवला. आम्हाला खूप आवडला. तुम्हीही बनवून बघा नक्की आवडेल.ही रेसिपी मला माझ्या मुलीनी करायला सांगितली.

सिडडू (siddu recipe in marathi)

#उत्तर #हिमाचल प्रदेश #
हिमाचल मधील कुल्लु, मनाली येथील ट्रेडिशनल, हेल्दी नाष्टा. हा वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो.हा स्टीम वर बनवतात. आज मी ड्राय फ्रुटस चा बनवणार आहे.हा पदार्थ मी पहिल्यांदा बनवला. आम्हाला खूप आवडला. तुम्हीही बनवून बघा नक्की आवडेल.ही रेसिपी मला माझ्या मुलीनी करायला सांगितली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 व्यक्ती साठी
  1. 2 कपगव्हाचं पीठ
  2. 1 टेबलस्पूनइस्ट
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 2 टेबलस्पूनकोमट पाणी
  5. 25 ग्रामअक्रोड
  6. 25 ग्रामबदाम
  7. 2 टेबलस्पूनखसखस
  8. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  9. 1 टेबलस्पूनधने पावडर
  10. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  11. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  12. 1 टीस्पूनमिरपूड
  13. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1 टेबलस्पूनसाखर
  16. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  17. 5-6पुदिन्याची पाने
  18. 1 टेबलस्पूनमीठ
  19. पाणी आवश्यकते नुसार

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    अक्रोड, बदाम, खसखस 5-6तास भिजत घालावेत. ईस्ट मध्ये साखर व कोमट पाणी घालून 10-15मिनटं ईस्ट ऍक्टिव्हेट करून घावें

  2. 2

    गव्हाच्या पिठात मीठ व तूप घालून मिसळून घ्या. त्यात ऍक्टिव्हेट केलेलं ईस्ट घालून थोडं थोडं पाणी घालून कणकेचा गोळा मळून घ्या. (जास्त घट्ट किंवा सैल नको) हा गोळा 3 तास गरम जागेवर जड कपड्यात झाकून ठेवा.

  3. 3

    हा गोळा 3तास गरम जागेवर जाड कपड्यात झाकून ठेवा

  4. 4

    अक्रोड, बदाम, खसखस वेगवगळे थोडं जाडसर वाटून घ्या. त्यात सर्व मसाले मीठ पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालून मिश्रण तयार करा.

  5. 5

    तीन तासाने गव्हाचं पीठफुलून वर यईल.ते चांगले मळून मळून घ्या. त्याचे मोठाले गोळे करून घ्या. हातावर एक गोळा कडे कडेनी दाबून दाबूनमोठी पुरी तयार करून त्यात ड्राय फ्रुटस चे मिश्रण फोटोत दाखवल्या प्रमाणे भरून बंद करून घ्या

  6. 6

    तयार झालेलं सीडडू चाळणीला तूप लावून चाळणीत ठेवा. गॅस वर स्टीमर मध्ये पाणी पाच मिनिट गरम करून चाळणी त्यावर ठेऊन 20 मिनिट मध्यम आचेवर सीडडू वाफवून घ्या. सीडडू तयार.भरपूर तुपा बरोबर हिरवी चटणी, सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes