बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजी (bedmi poori ani batyatyachi bhaji recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#उत्तर भारत
# उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात ह्वेज आणि नाॅनह्वेज दोन्ही प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. तेथील खाद्य संस्कृतीत दिल्ली, हरियाणा, मोगलाई यांचाही समावेश आहे. पदार्थ अतिशय चविष्ट आणि रूचकर असतात. मी केलेली बेडमी पूरी व बटाट्याची भाजी हा त्यांचा नाश्ता अतिशय प्रसिद्ध आहे.

बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजी (bedmi poori ani batyatyachi bhaji recipe in marathi)

#उत्तर भारत
# उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात ह्वेज आणि नाॅनह्वेज दोन्ही प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. तेथील खाद्य संस्कृतीत दिल्ली, हरियाणा, मोगलाई यांचाही समावेश आहे. पदार्थ अतिशय चविष्ट आणि रूचकर असतात. मी केलेली बेडमी पूरी व बटाट्याची भाजी हा त्यांचा नाश्ता अतिशय प्रसिद्ध आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 माणसांसाठी
  1. बेडमी पूरीसाठी लागणारे साहित्य:-
  2. 1/2 कपभिजलेली उडदाची डाळ
  3. 4 कपगह्वाचे पीठ
  4. 1/2 कपरवा
  5. 1 टेबलस्पूनहिरव्या मीरचीचा ठेचा
  6. 1 टेबलस्पूनआल्याचा ठेचा
  7. 1/4 टेबलस्पूनजी-याची भरड
  8. 1/4 टेबलस्पूनधण्याची भरड
  9. 1/4 टेबलस्पूनबडीशोपची भरड
  10. 1/2 टेबलस्पूनतिखट
  11. 1/2 टेबलस्पूनमीठ
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1/4 टेबलस्पूनकसूरी मेथी
  14. 1/4 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 3 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  16. 1/4 कपकोमट पाणी
  17. बटाट्याच्या भाजी साठी लागणारे साहित्य:-
  18. 2उकडलेले बटाटे
  19. 1/2 टेबलस्पूनआल्याचा ठेचा
  20. 1/2 टेबलस्पूनमीरचीचा ठेचा
  21. 1/2 टेबलस्पूनधण्याची भरड
  22. 1/2 टेबलस्पूनबडीशोपची भरड
  23. 1/4 टेबलस्पूनजीरे
  24. 1लाल सूकी मीरची
  25. 1/4 टेबलस्पूनहळद
  26. 1 टेबलस्पूनतिखट
  27. 1/4 टेबलस्पूनकसूरी मेथी
  28. 1/4 टेबलस्पूनआमचूर पावडर
  29. 1/4 टेबलस्पूनकाळे मीठ
  30. 1/2 टेबलस्पूनमीठ
  31. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  32. 1/4 टेबलस्पूनभिजवलेले मेथी दाणे
  33. चिमुटभरहिंग
  34. 2 टेबलस्पूनबेसन
  35. 5 कपपाणी
  36. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    बेडमी पूरी करायला लागणारे साहित्य घ्यावे. उडदाची डाळ 4 तास भिजत घालावी. पाणी काढून मिक्सरमधून वाटून घ्यावी. आल्याचा व मिरचीचा ठेचा करून घ्यावा. जीरे, धणे व बडीशोप यांची भरड करून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    परातीत गह्वाचे पीठ घ्यावे. त्यात रवा व मीरचीचा ठेचा घालावा.

  3. 3

    आल्याचा ठेचा, धण्याची भरड व बडीशोपची भरड घालावी.

  4. 4

    त्यात जी-याची भरड, तिखट व गरम मसाला घालावा.

  5. 5

    त्यात मीठ, कसूरी मेथी व वाटलेली उडदाची डाळ घालावी.

  6. 6

    तेल व कोथिंबीर घालून मीक्स करून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. 20 मिनीटे झाकून ठेवावे.

  7. 7

    20 मिनीटानंतर पीठ तेलाचा हात लावून छान मळून घ्यावे. त्याचे हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. गोल पूरी लाटून घ्यावी.

  8. 8

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात पूरी सोडावी. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्याव्यात. टिश्यू पेपरवर काढून ठेवाव्यात.

  9. 9

    ह्या पू-या बटाट्याच्या भाजी सोबत सर्ह्र करावे.

  10. 10

    बटाटे स्वच्छ धुवून कुकरमधे उकडून घ्यावेत. आल्याचा व मिरचीचा ठेचा करून घ्यावा. धण्याची व बडीशोपची भरड करून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

  11. 11

    गॅसवर एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झाले कि त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात आलं घालावे.

  12. 12

    मीरचीचा ठेचा, बडीशोपची व धण्याची भरड घालावी मिक्स करून घ्यावे.

  13. 13

    लाल सुक्या मिरच्या, हिंग व हळद घालून घ्यावी.

  14. 14

    तिखट व बेसन घालून परतून घ्यावे.

  15. 15

    त्यात बटाट्याच्या फोडी व पाणी घालून घ्यावे. त्यात काळे मीठ व मीठ घालून घ्यावे.

  16. 16

    उकळी आल्यावर त्यात गूळ घालून झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनीटे शिजू द्यावे.

  17. 17

    10 मिनीटानंतर झाकण काढून त्यात आमचूर पावडर व कसूरी मेथी घालावी व 2 मिनीटे शिजू द्यावे. गॅस बंद करावा. तयार भाजी बेडमी पूरी बरोबर खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes