खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)

Ragini Ronghe
Ragini Ronghe @cook_26452829

खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
4 - 5 सर्व्हिंग
  1. 2 वाटीसुके खोबरे ची चव / पावडर
  2. १.५ वाटी साखर
  3. 1/2 वाटीपाणी
  4. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम साहित्य वाटी च्या सहाय्याने मोजून घ्यावे. ज्या पराती मधे बर्फी सेट करायची आहे त्या परातीला किंवा ट्रे ला तूप लावून ग्रीस करून घ्यावे.

  2. 2

    गॅस वर कढई मधे साखर टाकून त्यात १/२ वाटी पाणी टाकून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. साखरे मधे, साखर भिजेल एवढेच पाणी टाकावे. पाणी कमी वापरल्या मुळे पाक घट्टसर तयार होईल.

  3. 3

    साखर पूर्ण पणे वितळल्या वर त्यात सुक्या खोबऱ्याचा चव टाकून छान मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    ५ - ६ मिनीटे मधे मिश्रण घट्ट होऊ लागले. लगेच तयार ट्रे मधे किंवा पराती मधे टाकून सारखे करून घ्यावे. पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे मिश्रण खूप लवकर घट्ट होऊ लागते तर ही प्रोसेस थोडी स्पीड नी करावी. थोडे गार झाले की बर्फी पडून घ्याव्या. आणि सेट होऊ द्यावे.

  5. 5

    थंड झाल्यावर तयार बर्फी अलगद सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ragini Ronghe
Ragini Ronghe @cook_26452829
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes