चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#इंटरनॅशनल
#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते

चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)

#इंटरनॅशनल
#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-५० मिनिटे
२-३ व्यक्तिसाठी
  1. १०० ग्रॅम मैदा
  2. ३० ग्रॅम पिठिसाखर
  3. 2अंडी
  4. ३० ग्रॅम कोको पावडर
  5. ३० ग्रॅम डार्क चॉकलेट
  6. ३० ग्रॅम व्हाईट चॉकलेट
  7. ५० ग्रॅम व्हाइट चॉकलेटचे बारीक पिसेस
  8. 1 टेबलस्पुनव्हॅनिला इसेन्स
  9. १०० ग्रॅम मेल्टेड बटर
  10. 1/2टेबल बेकिंग पावडर
  11. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

४०-५० मिनिटे
  1. 1

    चॉकलेट ब्राउनी बनवण्याची पुर्वतयारी म्हणजे मैदा कोको पावडर बेकिंग पावडर ऐकत्र करून चाळुन ठेवा केक टिन ग्रिस करून ठेवा डार्क चॉकलेट व व्हाईट चॉकलेट वेगवेगळे मेल्ट करून ठेवा व्हाईट चॉकलेटचे लहान लहान पिसेस करून ठेवा

  2. 2

    बाऊलमध्ये मेल्टेड बटर घेऊन त्यात ऐक ऐक अंड फोडून बिट करा नंतर त्यात पिठिसाखर व व्हॅनिला इसेंन्स टाकुन मिश्रण मिक्स करा

  3. 3

    नंतर त्या मिश्रणात अनुक्रमे मेल्ट केलेले डार्क चॉकलेट व व्हाईट चॉकलेट मिक्स करा व फेटुन घ्या

  4. 4

    नंतर त्यातच चाळलेला मैदा कोको पावडरचे मिश्रण व थोड मीठ मिक्स करा व फेटा

  5. 5

    मिश्रण फेटल्या नंतर ते केकटिन मध्ये ओतुन टॅप करून सेट करा त्याचवेळी१८० सेल्सियसवरOTG प्रिहिट करून घ्या सेट केलेल्या मिश्रणावर व्हाइट चॉकलेट चे बारीक केलेले पिस चोहोबाजुने टाका व प्रिहिटेडOTG मध्ये केक टिन ठेवुन २५ मिनिटे बेक करा

  6. 6

    बेक केलेली ब्राउनी अशी दिसते ती OTG च्या बाहेर काढुन थंड करा

  7. 7

    प्लेट मधे चॉकलेट ब्राउनी सर्व्ह करताना त्रिकोणी आयताकार चौकोनी कोणत्याही शेप मध्ये कट करून वरून पिठीसाखर भुरभरा किंवा व्हानिला आयस्क्रिम ही वरून देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes