झांगोरा खीर (वरीच्या तांदळाची खीर) (warichya tandulchi kheer recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#उत्तर
#उत्तराखंड
झांगोरा खीर ही उत्तराखंडाची लोकप्रिय खीर आहे. पांढर्‍या दाणे असलेल्या झांगोराला मराठीमध्ये वरईचे तांदूळ म्हणतात, जे आपण बर्‍याचदा उपवासात बनवतो. या खीरमध्ये कॅलरी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे पोषक तत्वे असतात.
उत्तराखंड मध्ये जेवणानंतर डेझर्ट म्हणून झांगोरा खीर सर्व्ह करतात. आपण ही खीर उपवासाच्या दिवशी बनवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

301 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटर दूध
  2. 200 ग्रामवरीचे तांदूळ (झांगोरा)
  3. 100 ग्रामसाखर
  4. 7-8बदाम काजू मनुके
  5. चारोळी
  6. केवडा इसेन्स किंवा गुलाब पाणी

कुकिंग सूचना

301 मि
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घेणे. वरीचे तांदूळ स्वच्छ धुऊन एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवावा

  2. 2

    एक लिटर दुधी मंद गॅस वर उकळायला ठेवणे त्यामध्ये साखर ही एकत्र मिक्स करून घ्यावे. दूध आटून पाऊण लिटर झाल्यावर त्यामध्ये वरीचा तांदूळ मिक्स एकत्र करून शिजायला ठेवणे. वरीचा तांदूळ दहा मिनिटांमध्ये चांगला फुलून शिजतो

  3. 3

    खीरीमध्ये एक चमचा तुपावर तळलेले काजू,बदाम, आणि मनुके घालावे. त्यानंतर त्यामध्ये चारोळी घालाव्यात. त्यामध्ये ३-४ थेबं केवडा इसेन्सचे घालावे. खीर नीट ढवळून घ्यावी

  4. 4

    झागोंरा खीर तयार आहे. ती तुम्ही थंड किंवा गरम कशीही खाण्यासाठी देऊ शकता. तिला जेवणानंतर डेझर्ट म्हणून खाण्यासाठी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes