वालाचं बिरडं (walache birde recipe in marathi)

#GA4#week 11
स्प्राउड्स हा की वर्ड घेऊन मी आज मोड आलेल्या वालाचं बिरडं बनवलं आहे. हे बनवायला सोपं असत पण मोड आल्यावर वाल सोलायला बराच वेळ लागतो.पण हल्ली बऱ्याच ठिकाणी असे सोललेले वाल मिळतात. मी नेहमी घरीच वाल भिजत घालून मोड आणून ते सोलून मी बिरडं बनवते.आमच्या कोकणात हे वालाचं बिरडं वेगवेगळ्या प्रकारांनी प्रत्येक घरी बनवतात.
वालाचं बिरडं (walache birde recipe in marathi)
#GA4#week 11
स्प्राउड्स हा की वर्ड घेऊन मी आज मोड आलेल्या वालाचं बिरडं बनवलं आहे. हे बनवायला सोपं असत पण मोड आल्यावर वाल सोलायला बराच वेळ लागतो.पण हल्ली बऱ्याच ठिकाणी असे सोललेले वाल मिळतात. मी नेहमी घरीच वाल भिजत घालून मोड आणून ते सोलून मी बिरडं बनवते.आमच्या कोकणात हे वालाचं बिरडं वेगवेगळ्या प्रकारांनी प्रत्येक घरी बनवतात.
कुकिंग सूचना
- 1
एक दिवस आधी वाल पाण्यात भिजत घाला. दुसऱ्या दिवशी वालातलं पाणी काढून ते एका स्वछ कपड्यात बांधून ठेवा किंवा मोड पात्रा मध्ये ठेऊन मोड काढून वाल सोलून घ्या.
- 2
कांदा खोबरं मध्यम गॅसवर भाजून घेऊन मिक्सर मधून वाटून घ्या. गँस वर पॅन ठेवून तेल घालून जिरं, हिंग, लसूण घालून त्यात वाल घालून परतावे.नंतर त्यात लाल तिखट, हळद गरम मसाला घालून परतून घ्यावे
- 3
परतलेल्या वालात दोन ते तीन कप पाणी घालून वाल दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यावेत.वाल थोडे शिजल्यावर त्यात वाटलेलं कांदा खोबरं घालून त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला वरून मीठ घाला.पाच ते दहा मिनिटे उकळून झाल्यावर गॅस बंद करा
- 4
बिरडं शिजल्यावर कोथिंबीर घालावी. गरम गरम बिरडं तयार. धो धो पाऊस पडत असला की हे गरम बिरडं भाता बरोबर खायला मस्त मज्जा येते.
Similar Recipes
-
पारंपरिक वालाचे बिरडे / डाळिंब्यांची उसळ (valyache birde recipe in marathi)
#कडवे वाल#वालाचे बिरडे#डाळिंब्यावालाचे बिरडे / डाळिंबीयांची उसळ हा पारंपरिक पदार्थ आहे.3 दिवस भिजत घालून मोड आल्यावर नंतर सोलून घेऊन त्याचे बिरडे, खिचडी, इ प्रकार केले जाते.प्रत्येक दाणा त्याचा सोलून घ्यावा लागतो, तसेच किडके असल्यास काढून टाकावा लागतो, सोलायला किचकट, वेळखाऊ, पण चवीला अधिक रुचकर लागतो.बरेच जण ह्यात कांदा, लसूण, पण घालतात, ते पण छान लागते.पण मला बिन कांदा लसूण चे खूप आवडते.हे वालाचे बिरडे खास नैवेद्य साठी किंवा इतर वेळेस करायला पण चांगले आहे. लागते पण छान. कडवे वाल असल्यामुळे त्यात गूळ हा लागतो च नाहीतर त्याचा कडवट पणा खूप लागतो, व उग्र लागते. Sampada Shrungarpure -
वालाचं बिरडं... अर्थात डाळिंब्या. (valanch birde recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज.. कोकणात पिकले जाणारे अजून एक कडधान्य म्हणजे कडवे वाल आणि गोडे वाल... या वाला पासून बिरडं म्हणजेच डाळिंब्या ची उसळ, डाळिंब्याभात, पडवळ डाळिंब्या, फणस डाळिंब्या.. असे वेगवेगळे पदार्थ शिजवले जातात. श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी घरोघरी उपवास सोडताना हमखास डाळिंब्या केल्या जातात .त्याचबरोबर लग्न मुंज अशा समारंभातून देखील डाळिंब्या, फणसाची भाजी यांची उपस्थिती असतेच असते. कडवे वाल्याचा डाळिंब्यांची चव अतिशय युनिक आहे. लहानपणी आई आम्हाला डाळिंब्या सोलायला द्यायची.. तेव्हा एक फार मोठा साग्र संगीत समारंभ आहे असेच वाटे.. वाल आधीएक दिवस गरम पाण्यात भिजत ठेवायचे . दुसऱ्या दिवशी उपसून मोड आणण्यासाठी मलमलच्या सुती कपड्यांमध्ये व्यवस्थित बांधून ठेवायचे. आणि ही बांधलेली पोटली मग एका उबदार जागी ठेवायची.. आणि तिसऱ्या दिवशी उघडून बघायचे वालाला मोड किती आलेत.. पुन्हा ते गरम पाण्यात भिजवायचे. आणि मग सोलायला घ्यायचे. सोलताना बोट दुखायची पण खूप मजा यायची.. आमच्या शेजारच्या फडके आजी होत्या.. त्या भाजीवाल्यांना डाळिंब्या सोलून देऊन आपल्या संसाराला मदत करीत असत..सहज आठवले आत्ता.. माझी अतिशय आवडती उसळ आहे.. चला तर मग नैवेद्यासाठी ची बिना कांदा लसूणाचं हे वादाचं बिरडं अर्थात डाळिंब्या कशा करायच्या ते सांगते तुम्हांला.. Bhagyashree Lele -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#kdrवालाचे बिरडे म्हणजे कडवे वाल म्हणतात. आमच्याकडे कडवे वालाचे सुद्धा रस्सा बनवतात. पण माझ्या घरी हे अशा पद्धतीने वालाचे बिरडे खूप आवडते Reshma Sachin Durgude -
वालाचे बिरडे (walache birde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7वालाच बिरड हे वर्षाच्या बारा महिने बनवलं होतं. श्रावणामध्ये खास करून बनवलं जातंच. Purva Prasad Thosar -
कडव्या वालाची उसळ (Kadvya Valachi Usal Recipe In Marathi)
कडवे वाल मोड आणून त्याची सालं काढून केलेली उसळ खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
वालच बिरड
#लॉकडाऊन १८ ठाणे जिल्हयात कोकणात वालाच बिरड न आवडणारा माणुस शोधुन ही भेटणार नाही म्हणजे च काय सगळयांनाच वाल खुपच आवडतात श्रावणात प्रत्येक उपासाला वालाची आमटी असतेच ( हे वाल आमच्या शेतातलेच) Chhaya Paradhi -
कडवे वाल अळूची भाजी (kadve vaal aluche bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ week 3# अळू ही एक रानभाजी आहे .श्रावणात भाजीचा अळू रानात वाडीत आपोआप उगवत असतो. अतिशय पोष्टीक भाजी.अळू मधे ऐ,बी,सीजीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅन्शियम नि अॅन्टीऑक्सिडंट खुप प्रमाणात असते त्यामुळे हिच्या सेवनाने शरीराला खुप फायदा होतो म्हणून ही भाजी वारंवार खावी .मग वेगवेगळे प्रकार केले की आणखीन खायला मजा येते .वाल पण प्रोटीनयुक्त शिवाय मोड आलेले . ही भाजी अत्यंत चवीला छान लागते अगदी अवश्य करून बघा आवडेल सर्वाना. 🎉एक सांगायचे राहिलेच ही भाजी नागपंचमीला नैवेद्य म्हणून जर शेंगा ( वाफवलेल्या करंज्या)केल्या तर ही बिरडे घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते.🎉 Hema Wane -
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
भरलं वांग (bharla wanga recipe in marathi)
##GA4#week 9भरलं वांग आम्हाला खूप आवडत. तें वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मी भरल्या वांग्यात बटाटा आणि वालपापडी चे वाल घालून हे वांग बनवते. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते. Shama Mangale -
कटाची आमटी (सार) (katachi amti recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकटाची आमटी ही पुरण शिजल्यावर त्या डाळीचे जास्तीचे पाणी असते त्यापासून बनवतात. ही आमटी तिखट, गोड, आंबट अशी असते. पुरण पोळी गोड असल्यामुळे ही कटाची आमटी खूपच छान लागते Shama Mangale -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya watanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफी 8 मोड आलेल्या कडधाण्याची आपण नेहमीच उसळ करतो...वेगळी काहीतरी म्हणून आज मी ही रेसिपी कारत आहे... Mansi Patwari -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
#मोड आलेल्या मुगाची उसळ#GRU Anita Desai -
मसालेदार भरलं कारलं फ्राय (Masaledar bharl karl fry recipe in marathi)
#MBR " मसालेदार भरलं कारलं " अगदी झटपट होणारी, माझी आवडती डिश म्हणजे" मसालेदार भरलं कारलं फ्राय "कारलं सर्वांनाचं आवडत असे नाही,पण मी आणि माझ्या मुलाला कारलं म्हणजे जीव की प्राण अशी गत होते ... तर चला मग निवडक मसल्यामध्ये नटलेली अशी ही रेसिपी बघूया ..👌👌 Shital Siddhesh Raut -
कोकण -पौष्टिक डीश नऊ कडधान्य ऊसळ (nau kaddhanynchi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटन सर्वांना आवडणारेआहे.मी नेहमी कोकणात जाते.कारण माझे सासर कोकणातले आहे.तेव्हा हा मेणू बर्याच वेळा केला जातो. वालाची भाजी असतेच,पण मी थोडाफार बदल करून नऊ प़कारची कडधान्य मोड आणून घेतली आहेत.पौष्टिकता वाढवण्यासाठी बदल केला आहे. Shital Patil -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
आज मी घरी तयार केलेला गोडा मसाला घालून मोड आलेल्या मसूरची खिचडी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
पडवळ डाळींब्यांची भाजी (padval dalibyachi bhaji recipe in marathi)
#KS150 वी रेसिपी.. 😄😄😄म्हणता म्हणता मी पन्नासव्या रेसिपी वर कधी पोहोचले काही समजलेच नाही, पण मस्त वाटतंय कूकपॅड टीम ने खूप छान प्लॅटफॉर्म चालू करून दिलाय.आता या रेसिपी बद्दल बोलते जरा... कडवे वाल आणि कोकण हे एक आजार समीकरणच मुळी त्यात रायगड मध्ये दर संकष्टी ला सगळ्यांच्या घरी अगदी ठरलेला बेत म्हणजे वालाचं बिरडं, वरण-भात, आणि उकडीचे मोदक.. आणि सासर अलिबाग असल्यामुळे एखाद वेळेस वाल नसले मग मात्र काहीतरी कमी आहे असा वाटतं.. त्याच कडव्या वालाची भाजी केलीये... 😀 Dhanashree Phatak -
माठाच्या देठाची भाजी (mathachya dethachi bhaji recipe in marathi)
#shr week 3श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावणात खुप ताज्या आणि वेगवेगळ्या भाज्या मिळतात. त्यातलीच लाल माठाचे देठ. ही भाजी आमच्या कडे उपवास सोडताना श्रावणात करतात. Shama Mangale -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 कोकणातील सगळ्यांचे आवडते कडधान्य म्हणजे कडवे वाल हे खुपच पौष्टीक असतात त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. स्रियांसाठी अधिक गुणकारी आहेत. पाचक, वेदनाशामक, फायबर मोठ्या प्रमाणात असते. बद्धकोष्ठ, मूळव्याध हे त्रास होत नाही . मूत्रविकारात गुणकारी अशा पौष्टीक वालाची आमटी खुपच टेस्टी लागते. सणासमारंभात श्रावणात. ही उसळ आर्वजुन केली जाते. चला तर बघुया ही वालाची आमटी कशी करायची ते Chhaya Paradhi -
वाल वांग बटाटा भाजी (Val Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2कडवे वाल याची वांगा, बटाटा बरोबरची सुकी भाजी अतिशय सुंदर लागते . Anushri Pai -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
कोकणात हमखास बनणारी भाजी...वाटण न वापरता केलेली वालाची भाजी म्हणजे डाळींबी उसळ... दोन्ही चविष्टच!!! Manisha Shete - Vispute -
कडव्या वालाची भाजी/बिरडे (kadvya valachi bhaji recipe in marathi)
#KS1कडवे वाल एरवीही बहुतेकांच्या आवडीचे. कारण उर्वरित महाराष्ट्रात जशी हरभरा, मसूर, मूग, मटकी ही कडधान्यं घेतली जातात, तसं कोकणात मुख्यतः वालाचं पीक घेतलं जातं. श्रावणात उपवासाला ,सणासुदीला वालाची भाजी ही केली जाते. nilam jadhav -
वालाचे बिरडे (नारळाचे दुध घालून) (valyache birde recipe in marathi)
#GA4 #week12 #Beans शब्द घेऊन मी ऑलटाईम फेवरेट वालाचे बिरडे केलेय .फक्त थोडा बदल केलाय नारळाचे दुध टाकले आहे . Hema Wane -
मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)
#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्समोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले Dhanashree Suki -
वालाचे बिरडे
#लॉकडाऊन पाककृतीकोकणी माणसाचा दुखरा बिंदू म्हणजे कडव्या वालाचे बिरडे.बोड नियोजन लागतं करायला, पण तर आठवणीने करतात गृहिणी. करायच्या दोन दिवस आधीच्या रात्री जितके बिरडे हवे आले त्याच्या एक तृतीयांश सुके वाल पानुत्त भिजत टाकायचे. दुसऱ्या सकाळी उठल्यावर आठवणीने त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि अंधाऱ्या जागी उबदार कोपऱ्यात वाल मोड आणायला ठेवायचे. तिसऱ्या सकाळी उठल्यावर त्यात कोमट पाणी ओतून ते परत भिजू द्यायचे.नंतर सालं काढून वाल सोलून घ्यायचे,स्वच्छ धुवून ,निथळून घेतले की झाले वाल भाजी करायला तयार.आवडीनुसार यात बटाटा,टोमॅटो,कैरी,शेवग्याच्या धेंग घालू शकता.मी बटाटे घालून केलंय.करा तर पूर्वतयारी.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamrut recipe in marathi)
#KS2ही एक पारंपरिक रेसिपी आहे . आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवीने युक्त हे पंचामृत अप्रतिम लागते .माझ्या माहेरी आणि माझ्या मताने पुण्यातील बऱ्याच ठिकाणी हे पंचामृत बनविले जाते खास करून भाद्रपदा मध्ये जे पित्र असतात त्या पितरांच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये आणि गौरी जेवणाच्या दिवशी गौरी च्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये हे पंचामृत हमखास बनविले जाते . Suvarna Potdar -
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
More Recipes
टिप्पण्या