परतोंवाला मुघलई अंडा पराठा (mughlai nada paratha recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#worldeggchallenge मध्ये egg-cellent चॅलेंज मिळाला अंडी वापरण्याचा.

थंडी = अंडी
निम्म्या भारताची सकाळची न्याहरी पराठा असते आणि मुघल आपल्या देशावर राज्य करत असताना मुघलई ही एक cuisine आपल्याला त्यांच्याकडून देणगी म्हणून मिळालेली आहे.
ह्या सर्वांचा मिलाफ म्हणून मी #परतोंवाला #मुघलई #अंडा #पराठा ही रेसिपी निवडली.
नक्की करून पहा, तुम्हाला १००% आवडेल.

परतोंवाला मुघलई अंडा पराठा (mughlai nada paratha recipe in marathi)

#worldeggchallenge मध्ये egg-cellent चॅलेंज मिळाला अंडी वापरण्याचा.

थंडी = अंडी
निम्म्या भारताची सकाळची न्याहरी पराठा असते आणि मुघल आपल्या देशावर राज्य करत असताना मुघलई ही एक cuisine आपल्याला त्यांच्याकडून देणगी म्हणून मिळालेली आहे.
ह्या सर्वांचा मिलाफ म्हणून मी #परतोंवाला #मुघलई #अंडा #पराठा ही रेसिपी निवडली.
नक्की करून पहा, तुम्हाला १००% आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
१ माणूस
  1. 1/4 वाटीकणीक
  2. 1/4 वाटीमैदा
  3. 1 मोठा चमचाबारीक रवा
  4. साजूक तूप
  5. 1अंडे
  6. 1/4कांदा
  7. 1/4टोमॅटो
  8. 1/2हिरवी मिरची
  9. 1 चमचाकोथिंबीर
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. 1/2 चमचाकांद्याची पात

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    कणिक, मैदा आणि रवा एकत्र मिसळून घ्या. त्यात ⅛ चमचा मीठ आणि १ मोठा चमचा तूप मिसळा. मग लागेल तसे दूध घालून मऊसर गोळा मळून १० मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  3. 3

    एका वाटी मध्ये अंडे फोडून फेटून घ्या. त्यात आले लसूण पेस्ट आणि ⅛ चमचा मीठ घाला. मग त्यात कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा फेटून घ्या.

  4. 4

    कणकेचा गोळा थोडा मळून घ्या. त्याची मोठी आणि पातळ पोळी लाटा. मग पोळीला पातळ तुपाचा हात लावून त्यावर थोडी कणिक भुरभुरून घ्या. आता पोळीचे लांबट तुकडे कापा. एका तुकड्याची गुंडाळी करा. मग ती गुंडाळी दुसऱ्या तुकड्यावर ठेवून त्याची गुंडाळी करा. अश्या सगळ्या तुकड्यांची एक मोठी गुंडाळी होईल. ह्यामुळे पराथ्याचे खूप पदर सुटतात आणि हा खूप छान खुसखशीत आणि flaky होतो.

  5. 5

    आता ही गुंडाळी हाताने नीट करून त्याची मोठी पोळी लाटा. त्यावर पातळ तूप लावून घ्या. मग त्यावर अंड्याचे मिश्रण मधोमध ठेवून चारही बाजूंनी पोळीची घडी करा. एकीकडे तवा तापवून घ्या.

  6. 6

    अलगद हाताने मुघलई अंडा पराठा तव्यावर ठेवा. उलथन्याने दाबून थोडे थोडे तूप सोडून दोन्हीकडून खरपूस भाजून घ्या.

  7. 7

    कोणत्याही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा #परतोंवाला #मुघलई #अंडा #पराठा! ह्याच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes