मोड आलेल्या कडधान्यांची उसळ (mod aalelya kaddhanyanchi usal recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week11
पझल मधील स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्ये.

मोड आलेल्या कडधान्यांची उसळ (mod aalelya kaddhanyanchi usal recipe in marathi)

#GA4 #week11
पझल मधील स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्ये.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 2 टेबलस्पूनमसूर
  2. 2 टेबलस्पूनमटकी
  3. 2 टेबलस्पूनहिरवे मुग
  4. 2 टेबलस्पूनहरबरा
  5. 1मोठा कांदा
  6. 1टोमॅटो
  7. 8-10कढीपत्त्याची पाने
  8. 1 टेबलस्पूनआलं - लसूण पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनकांदा - लसूण मसाला
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1.1 /2 टीस्पून मीठ
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनजीरे-मोहरी
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 2-3 टेबलस्पूनतेल
  16. थोडे पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व कडधान्ये निवडून घेणे. स्वच्छ पाण्याने धुवून घेणे व पाणी घालून दिवसभर भिजत ठेवणे.

  2. 2

    रात्री पाणी निथळून घ्यावे. मोडाच्या भांड्यामध्ये मोड येण्यासाठी रात्रभर ठेवावे.

  3. 3

    सकाळी छान मोड आलेले दिसतात. कांदा,टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. आलं- लसूण पेस्ट किंवा किसून घ्यावे. गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की,जीरे-मोहरी,हिंग, कढीपत्त्याची पाने घालून परतवून घेणे.

  4. 4

    नंतर कांदा घालून थोडावेळ परतणे.नंतर टोमॅटो चांगले परतवून घेणे. सर्व मसाले, मीठ घालून परतणे. तेल सुटेपर्यंत छान परतवून घेणे.

  5. 5

    मोड आलेले कडधान्ये घालून चांगले परतवून घेणे. पाणी घालून शिजवून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes